---Advertisement---

“पंतप्रधानांनी स्वतः यावे आणि भारतात रस्त्यावर पडलेले मृतदेह पहावे”, मायकेल स्लेटर पुन्हा बरसला

On: गुरूवार, मे 6, 2021 9:18 AM
---Advertisement---

भारतात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, बीसीसीआयने आणि आयपीएलच्या कमिटीने आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. ३ मे ला कोलकाता नाईट रायडर्स संघातील २ खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह आले होते. तर त्यानंतर एकापाठोपाठ एक खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह येऊ लागले होते. माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मायकल स्लेटर देखील या आयपीएल स्पर्धेत समालोचकाची भूमिका पार पाडत होते. परंतु भारतात कोरोनाची भयानक स्थिती पाहता त्यांनी आयपीएल स्पर्धेतून माघार घेत मालदीव कडे आपला मोर्चा वळवला होता. परंतु आता ऑस्ट्रेलियन खेळाडूंना, ऑस्ट्रेलियन सरकार सहकार्य करत नसल्याने मायकल स्लेटरने त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

आयपीएल स्पर्धा स्थगित केल्यानंतर, ऑस्ट्रेलियन खेळाडू आपल्या मायदेशी जाण्यासाठी वाट पाहत आहेत. परंतु ऑस्ट्रेलियन सरकारने १५ मे पर्यंत देशाच्या सीमा भारतातून येणाऱ्या विमानांसाठी बंद केल्या आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडू भारतातच अडकून आहेत. अशातच मायकल स्लेटरने पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांवर निशाणा साधत लिहिले की, “हे खूप विचित्र आहे की, पंतप्रधानांनी मानवी शोकांतिकेचा मुद्द्यावर दुर्लक्ष केले आहे. भारतात राहणाऱ्या ऑस्ट्रेलियन लोकांच्या मनात खरी भीती आहे. कसे होईल जर तुम्ही तुमच्या खाजगी विमानातून याल आणि पाहाल की, इथे मृतदेह रस्त्यावर पडून आहेत. ”

https://twitter.com/mj_slats/status/1389880437523161094

तसेच तो पुढे म्हणाला की, “आता मी वाचले की, कॉमन सेन्सच्या जागी लोभाबद्दल चर्चा केली जात आहे. तुमच्या सरकारने मला काम करण्याची परवानगी दिली, जेणेकरुन मी माझ्या तीन सुंदर मुलांच्या शाळेची फी आणि घरांचे हप्ते भरू शकतो. तर कॉमन सेन्स कुठे खोटं बोलत आहे.” तसेच त्यांनी पुढे लिहिले की, “पंतप्रधान, मी कधीही तुमच्यासोबत वादविवाद करण्यास तयार आहे.”

https://twitter.com/mj_slats/status/1389899615000875012

भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. प्रत्येक दिवशी हजारो लोक कोरोना मुळे आपला जीव गमावत आहेत. त्यांनी भारतीय जनते बद्दल आपल्या भावना व्यक्त करत लिहिले की, “सर्व भारतीयांना माझ्याकडून भरपूर प्रेम आणि प्रार्थना, मी जेव्हा जेव्हा भारतात आलो मला प्रेम मिळाले आहे. सुरक्षित राहा..”

https://twitter.com/mj_slats/status/1389881941923483651

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---