क्रिकेटविश्वातून दु:खद बातमी पुढे येत आहे. बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू मुशर्रफ हुसैन रुबेल याचे कॅन्सरमुळे निधन झाले आहे. वयाच्या ४०व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून मुशर्रफ कॅन्सरशी लढत होता, अखेर मंगळवारी (१९ एप्रिल) यूनायटेड रुग्णालयात त्याने शेवटचा श्वास घेतला. त्याच्या कुटुंबियांनी याबद्दल माहिती दिली आहे.
बांगलादेश मीडियानुसार, मशर्रफच्या कुटुंबियांनी माहिती दिली आहे की, “कॅन्सरशी लढा देत असलेल्या मुशर्रफचे मंगळवारी दुपारी युनायटेड रुग्णालयात निधन झाले आहे. मार्च २०१९ मध्ये त्याला ब्रेन ट्यूमर असल्याचे पुढे आले होते. गतवर्षी पुन्हा त्याला ट्यूमरचा त्रास जाणवला होता, परंतु त्यावर त्वरित उपचार केल्यानंतर तो बरा झाला होता.”
The Bangladesh Cricket Board (BCB) mourns the passing of former Bangladesh National Team player Musharraf Hossain Rubel.The left-arm spinner amassed over 550 wickets across all formats in a career spanning two decades. The BCB extends profound sympathies and condolences.#BCB pic.twitter.com/mKJaslFU9q
— Bangladesh Cricket (@BCBtigers) April 19, 2022
Musharraf Rubel . You will be remembered.
1981 – 2022.
Former Bangladesh left-arm spinner Mosharraf Hossain Rubel has passed away today! Innalillahi Wa Inna Ilaihi Rajiun. pic.twitter.com/4ovEgzf4s7
— Hossain Tareq (@HossainTareq6) April 19, 2022
मुशर्रफच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने २००८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे क्रिकेटद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पुढे २०१६ पर्यंत त्याने बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. यादरम्यान त्याने ५ वनडे सामने खेळताना २६ धावा काढल्या होत्या. तसेच ४ विकेट्सही घेतल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
Video: लाईव्ह सामन्यात वेंकटेशवर भडकला कर्णधार श्रेयस, मोठ्याने ओरडत व्यक्त केला राग; पण का?
केकेआरच्या खेळाडूला जोराने डोक्यावर लागला चेंडू, पाहून चहलच्या हृदयाची वाढली धडधड; केली विचारपूस
चहल आयपीएलमध्ये हॅट्रिक घेणारा १८ वा खेळाडू; याआधी ‘या’ १७ गोलंदाजांनी केलाय असा कारनामा