Monday, May 16, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आमदार चषक राज्यस्तरीय ज्यूनियर ज्यूदो स्पर्धा २१ एप्रिलपासून

३१ जिल्ह्यातून १६ वजनी गटात सुमारे ३०० मुला-मुलींचा सहभाग; राष्ट्रीय स्पर्धेसाठी होणार राज्य संघाची निवड

April 19, 2022
in अन्य खेळ, टॉप बातम्या

पुणे: महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशनच्या वतीने आमदार चषक ४८ व्या राज्यस्तरीय ज्युनियर (मुले व मुली) ज्यूदो स्पर्धा आणि राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन २१ ते २३ एप्रिल दरम्यान टिळक रोड येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या हॉलमध्ये करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशनचे महासचिव शैलेश टिळक यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार व या स्पर्धेच्या संयोजिका मुक्ता टिळक, तांत्रिक समितीचे सरचिटणीस दत्ता आफळे, भाजपा कसबा विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे आणि स्पर्धा संचालक दीपक होले उपस्थित होते.

शैलेश टिळक म्हणाले, या स्पर्धेसाठी कसबा मतदार संघाच्या विद्यमान आमदार मुक्ता टिळक यांच्या आमदार निधीतून या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य मिळाले आहे. या स्पर्धेसाठी शिक्षण प्रसारक मंडळीचे सहकार्यसुध्दा लाभले आहे. आगामी काळात होणाऱ्या ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्रचा संघ निवडण्यात येणार असल्यामुळे या स्पर्धेला विशेष महत्व राहणार आहे. स्पर्धेसाठी राज्यातील ३१ जिल्ह्यातून सुमारे ३५० वर खेळाडू व त्यांचे मार्गदर्शक, संघ व्यवस्थापक आणि तांत्रिक अधिकारी सहभागी होणार आहेत. स्पर्धा मुला-मुलींच्या एकूण १६ वजनी गटात होणार आहे. राज्यातील ३५ तांत्रिक अधिकारी या स्पर्धेच्या आयोजनाची संपूर्ण जबाबदारी संभाळणार आहेत. खेळाडू, मार्गदर्शक व व्यवस्थापकांची निवास व भोजनाची व्यवस्था सर परशूरामभाऊ महाविद्यालयाच्या (स प) होस्टेलमध्ये करण्यात आली आहे.

कसबा विधानसभा मतदार संघाच्या विद्यमान आमदार मुक्ता टिळक यावेळी म्हणाल्या, ज्यूदो हा खेळ शालेय स्तरापासून मुला-मुलींनी शिकणे आवश्यक आहे. सध्याच्या काळाची ती गरज आहे, स्वत:चे रक्षण करायचे असेल तर प्रत्येक मुला-मुलीने हा खेळ शिकावा. ही स्पर्धा शहरात घेण्यामागे मुख्य उद्देश हाच आहे. शहरातील शालेय मुला-मुलींना ही स्पर्धा पाहण्याची संधी मिळेल. याच बरोबर शालेय स्तरापासून स्पर्धेत सहभागी होऊन जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक जिंकून आपल्या पुणे शहरासह महाराष्ट्राचे व भारताचे नावलौकिक करावे. स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन मुबंई क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते २२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.

महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशनच्या तांत्रिक समितीचे सरचिटणीस दत्ता आफळे म्हणाले, या स्पर्धेत १५ वर्षे पूर्ण आणि २१ वषार्खालील मुले आणि मुली सहभागी होणार आहेत. मुलांसाठी ५५ किलो वजनगटापासून १०० किलो वजनगटावरील असे ८ तर मुलींसाठी ४४ किलो वजनगटापासून ते ७८ किलोवरील असे ८ वजन गट असणार आहेत. बाहेरील जिल्ह्यातील खेळाडूंचे आगमन २१ एप्रिल रोजी सकाळी होईल. त्यानंतर खेळाडूंची वजने घेतली जाणार आहे. याचवेळी खेळाडूंच्या जन्म तारखेच्या दाखल्यांची आणि इतर कागदपत्रांची तपासणी होईल. दुपारनंतर प्रत्यक्ष स्पर्धेला सुरूवात केली जाईल.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

विराटसोबतच्या ‘त्या’ वादाबद्दल सूर्यकुमारने केला उलगडा; म्हणाला, ‘मी जाणून बुजून वाद घातला…’

त्याचं वय पाहू नका, खेळ पाहा; टी२० विश्वचषकासाठी ‘या’ दिग्गजाने फिनिशर म्हणून सुचवलंय दिनेश कार्तिकचं नाव

‘हरायचेच असेल तर, असे लढून…’, राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर संघमालक शाहरुखने केकेआरला दिले प्रोत्साहन


ADVERTISEMENT
Next Post
bangladesh

प्रसिद्ध क्रिकेटपटूचे कॅन्सरमुळे निधन, ४०व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

हसू की रडू? पहिल्याच चेंडूवर विकेट गमावल्यानंतर विराटने दिले असे हावभाव, रिऍक्शन व्हायरल

RCB-Team

आरसीबीचा विजयरथ सुस्साट, लखनऊला १८ धावांनी लोळवले; फाफ आणि हेजलवुड विजयाचे शिल्पकार

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.