भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक सध्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेजर्स बेंगलोरचे प्रतिनिधित्व करत आहे. चालू हंगामात कार्तिक ज्या पद्धतीने सामन्याचा शेवट करत आहे, ते पाहून एखाद्या युवा फिनिशरला नक्कीच प्रेरणा मिळेल. याच पार्श्वभूमीवर कार्तिकचे सर्वत्र कौतुक होत आहे. आता कार्तिकच्या प्रदर्शनाविषयी भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावसकर व्यक्त झाले आहेत.
यावर्षी टी-२० विश्वचषक खेळला जाणार आहे आणि गावसकरांच्या मते भारताला कार्तिकसारख्याच एका फिनिशरची गरज आहे. सुनील गावसकर (Sunil Gavaskar) दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) विषयी बोलताना म्हणाले की, “तो (कार्तिक) टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाचा भाग बनू इच्छित आहे. मला म्हणायचे आहे की, तुम्ही त्याच्या वयावर जाऊ नका, फक्त हेच पाहा की, तो कशी खेळी करत आहे. त्याने स्वतःच्या प्रदर्शनाच्या जोरावर सामन्याची दिशा बदलून दाखवली. तो तसेच काम करत आहे, जे सहाव्या किंवा सातव्या क्रमांकाच्या फलंदाजाकडून टी-२० विश्वचषकात अपेक्षित असेल.”
दरम्यान, दिनेश कार्तिकच्या चालू आयपीएल हंगामातील प्रदर्शनाचा विचार केला, तर ते खूपच अप्रतिम राहिले आहे. त्याने मागील दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात अवघ्या ३४ चेंडूत नाबाद ६६ धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून देण्यासाठी महत्वाचे योगदान दिले.
चालू आयपीएल हंगामातील पहिल्या सामन्यात त्याने पंजाब किंग्जविरुद्ध नाबाद ३२ धावा केल्या. दुसऱ्या सामन्यात त्याने केकेआरविरुद्ध नाबाद १४, त्यानंतर तिसऱ्या सामन्यात राजस्थानविरुद्ध नाबाद ४४ धावा केल्या. चौथ्या सामन्यात आरसीबीचा सामना मुंबई इंडियन्ससोबत झाला आणि कार्तिकने नाबाद ७ धावा केल्या. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध मात्र तो ३४ धावा करून बाद झाला होता.
कार्तिकच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने २६ कसोटी सामने, ९४ एकदिवसीय आणि ३२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने भारतीय संघासाठी खेळलेल्या शेवटच्या सामन्याचा विचार केला, तर एकदिवसीय विश्वचषकातील उपांत्य सामन्यात भारतासमोर न्यूझीलंडचे आव्हान होते, जा कार्तिकचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
Video: लाईव्ह सामन्यात वेंकटेशवर भडकला कर्णधार श्रेयस, मोठ्याने ओरडत व्यक्त केला राग; पण का?
हर्षल पटेल व्हर्जन २.०! आरसीबीच्या गोलंदाजाचा नवा अवतार, सरावादरम्यान मारला ‘नो लूक सिक्स’