Monday, May 23, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

केकेआरच्या खेळाडूला जोराने डोक्यावर लागला चेंडू, पाहून चहलच्या हृदयाची वाढली धडधड; केली विचारपूस

केकेआरच्या खेळाडूला जोराने डोक्यावर लागला चेंडू, पाहून चहलच्या हृदयाची वाढली धडधड; केली विचारपूस

April 19, 2022
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या

राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेला सामना अतिशय रोमांचक राहिला. शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या या सामन्यात राजस्थानने बाजी मारली. त्यांनी ७ धावांनी हा सामना जिंकला. या सामन्यादरम्यान एकवेळ अशी होती, जेव्हा कोलकाता संघाने १८० धावांवर ८ विकेट्स गमावल्या होत्या. परंतु उमेश यादवने अंतिम षटकांमध्ये जीव पणाला लावत विस्फोटक फलंदाजी केली. परंतु तो संघाचा पराभव टाळू शकला नाही.

या सामन्याददरम्यान (KKR vs RR) कोलकात्याचा एक खेळाडू गंभीर दुखापतग्रस्त होण्यापासून वाचला. त्याच्यामुळे काही सेकंदांसाठी युझवेंद्र चहलच्या (Yuzvendra Chahal) हृदयाचे ठोके वाढले होते. 

हा प्रसंग कोलकाताच्या डावातील १९व्या षटकादरम्यान घडला. राजस्थानच्या २१८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताने १७ षटकांपर्यंत १८० धावांवर आघाडीचे ८ फलंदाज गमावले होते. त्यामुळे अंतिम षटकांमध्ये कोलकाताकडून शेल्डन जॅक्शन (Sheldon Jackson) आणि उमेश यादव (Umesh Yadav) फलंदाजी करत होते.

दरम्यान राजस्थानकडून प्रसिद्ध कृष्णा १९ वे षटक टाकण्यासाठी आला होता. त्याच्या या षटकातील पहिल्याच चेंडूवर यादवने जोरदार फटका मारला आणि चेंडू सरळ नॉन स्ट्राईकर बाजूला उभा असलेल्या जॅक्सनच्या दिशेने गेला. हा सर्व प्रकार इतक्या वेगाने घडला की, जॅक्सन स्वतला त्या चेंडूपासून वाचवू शकला आणि चेंडू जोराने येऊन त्याच्या डोक्यावर आदळला. सुदैवाने त्यावेळी त्याच्या डोक्यावर हेल्मेट होते, त्यामुळे त्याला तितक्या वेदना जाणवल्या नाहीत.

परंतु जॅक्सनला इतक्या जोराने चेंडू (Ball Hit Head Of Sheldon Jackson) लागल्याचे पाहून क्षेत्ररक्षण करत असलेल्या चहलच्या (Yuzvendra Chahal) हृदयाचे ठोके मात्र वाढले होते. तो त्वरित जॅक्सनजवळ जाऊन त्याची चौकशीही करताना दिसला. यावर जॅक्सनने तो बरा असल्याचे सांगितले. तसेच त्याने आपल्याला तपासण्यासाठी मैदानावर धाव घेत असलेल्या फिजिओंनाही आपण बरे असल्याचे सांगितले आणि त्यांना मैदानात येण्यापासून रोखले.

pic.twitter.com/HDFMLnZXYL

— Peep (@Peep_at_me) April 18, 2022

पुढे २०व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर ओबेय मॅककॉयच्या गोलंदाजीवर प्रसिद्धच्या हातून जॅक्सन झेलबाद झाला. तो केवळ ८ धावांचे योगदान देऊ शकला. तर यादवही ९ चेंडूंमध्ये २ षटकार आणि १ चौकाराच्या मदतीने २१ धावा करू शकला. त्यानेही शेवटच्या षटकातील चौथ्या चेंडूवर आपली विकेट गमावली.

महत्त्वाच्या बातम्या-

कोरोनामुळे ट्वीटरवर ‘कॅन्सल आयपीएल’ ट्रेंडला, जाणून घ्या मुंबई आणि सीएसकेचे चाहते का होतायत ट्रोल?

IPL2022| लखनऊ वि. बेंगलोर सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!

गरमागरमी! फिंच बाद होताच प्रसिद्ध कृष्णाबरोबर झाला वाद, मग गोलंदाजानेही दिले प्रत्युत्तर, पाहा Video


ADVERTISEMENT
Next Post
Harshal-Patel-batting

हर्षल पटेल व्हर्जन २.०! आरसीबीच्या गोलंदाजाचा नवा अवतार, सरावादरम्यान मारला 'नो लूक सिक्स'

KL-Rahul-Faf-Du-Plesis

LSGvsRCB | गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचण्यासाठी लखनऊ आणि बेंगलोरमध्ये झुंज, पाहा प्लेइंग इलेव्हन

Video: लाईव्ह सामन्यात वेंकटेशवर भडकला कर्णधार श्रेयस, मोठ्याने ओरडत व्यक्त केला राग; पण का?

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.