भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध टी20 आणि एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी श्रीलंकेला पोहचला आहे. टीम इंडिया सोबत स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या देखील आहे. तो फक्त टी20 मालिकेसाठी संघात आहे. तर एकदिवसीय मालिकेसाठी व्यक्तिक कारणांमळे गाैरहजर राहणार आहे. या दरम्यान बडोदा क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक डेव्हनेल व्हॉटमोर हार्दिक पांड्यावर मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हणाले हार्दिकला अष्टपैलू म्हणणे आश्चर्यकारक आहे. प्रशिक्षक हार्दिक पांड्याबद्दल असे वक्तव्य करण्यामागे काय कारण असेल ते जाणून घेऊयात.
एका यूट्यूब चॅनलवर व्हॉटमोर म्हणाले, ‘अजूनही काही खेळाडू आहेत जे पांढऱ्या चेंडूचे क्रिकेट खेळत नाहीत. उदाहरणार्थ, बडोद्यात माझ्या गेल्या काही वर्षांमध्ये हार्दिक पांड्या कधीही पांढऱ्या चेंडूचे क्रिकेट खेळला नाही. मला नेहमीच आश्चर्य वाटते की त्याला बडोद्याचा अष्टपैलू खेळाडू म्हटले जाते, पण तो बडोद्यासाठी वर्षानुवर्षे खेळला नाही! तर होय, असे काही लोक आहेत जे हे करत नाहीत. हार्दिक पांड्याने 2018 पासून बडोदा संघासाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलेले नाही.
व्हॉटमोर पुढे म्हणाले, ‘पण अलीकडेच मी पाहिले आहे की बीसीसीआय खेळाडूंना रणजी ट्रॉफी तसेच इतर फॉरमॅटमध्ये सहभागी होऊ देण्यास उत्सुक आहे. ते क्रिकेटकडे खेळ म्हणून पाहतील याची खात्री करण्यासाठी. चार दिवसीय क्रिकेटकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
अलीकडच्या काळात हार्दिक पांड्या आपल्या व्यक्तिक आणि व्यवसायिक कारणामुळे खूपच चर्चेत आहे. अलीकडेच पांड्याने सोशल मीडियावर पत्नी नताशा स्टॅनकोविचपासून घटस्फोटाची घोषणा केली. याशिवाय हार्दिककडून टी20 फॉरमॅटचे कर्णधारपदही काढून घेण्यात आले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या आगामी टी20 मालिकेसाठी सूर्यकुमार यादवची कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. यासर्व चर्चांदरम्यान हर्दिक पांड्या गाैतम गंभीरच्या प्रशिक्षकतेखाली टी20 मालिका खेळण्यास तयार आहे.
हेही वाचा-
“कसोटीमध्ये आम्ही एका दिवसात 600 धावा करु शकतो” इंग्लंडच्या ‘या’ खेळाडूचा मोठा खुलासा
खेळाच्या विश्वातील सुपरस्टार! या क्रिकेटपटूच्या पत्नीनं ऑलिम्पिकमध्ये जिंकली आहेत 2 पदकं
श्रीलंका मालिकेपूर्वी संघाला धक्का, स्टार वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर