भारतीय संघाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी करुण नायरबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. करुण नायरला भारतीय संघात स्थान मिळवण्याची आणखी एक संधी मिळू शकते. बांगर यांच्या मतानुसार, करुण नायरची घरगुती क्रिकेटमधील कामगिरी चांगली आहे आणि म्हणूनच त्याला संघात स्थान द्यायला हवे.
भारतीय संघाला फलंदाजीमुळेच जागतिक कसोटी अजिंक्यपदच्या अंतिम सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. या काळात अनेक फलंदाजांनी खराब प्रदर्शन केले. त्याचबरोबर अशी बातमीही समोर येत आहे की, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी हनुमा विहारीसारख्या खेळाडूच्या जागी संघ व्यवस्थापनाला अधिक पर्यायांना आजमावून पाहायचे आहे.
क्रिकेट डॉट कॉमशी बोलत असताना संजय बांगर म्हणाले की, “हनुमा विहारी ही एक चांगली गुंतवणूक आहे. कारण त्याने संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. काही महिन्यांपुर्वीच त्याने आपल्या फलंदाजीने सिडनी कसोटी सामना अनिर्णित ठेवला होता. तो खूप चांगला फलंदाज आहे. परंतु आणखी एक खेळाडू आहे जो मधल्या फळीत उतरला आहे आणि तो करुण नायर आहे. त्याच्या कसोटी सामन्यांच्या नोंदी आणि प्रथम श्रेणी सामन्यांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता त्याला संघात स्थान मिळायला पाहिजे. अवघ्या एक-दोन सामन्यांमध्ये खराब कामगिरीनंतर तो संघाबाहेर झाला आहे.”
करुण नायरने कसोटी क्रिकेटमध्ये तिहेरी शतक झळकावले
तुम्हा सर्वांना माहितीच असेल की, करुण नायरने कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावले आहे. करुण नायरने हे तिहेरी शतक इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात केले होते. मात्र त्यानंतर त्याचा फॉर्म तितका चांगला नव्हता आणि त्याला कसोटी संघातून वगळण्यात देखील आले होते. त्याने शेवटचा कसोटी सामना २०१७ साली खेळला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
लव्ह की अरेंज मॅरेज? चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर स्म्रीती मंधानाचे ‘स्मार्ट’ उत्तर
‘तो ५-६ वर्षांपुर्वीसारखा खेळाडू राहिला नाही,’ रहाणेच्या फ्लॉप कामगिरीवर माजी क्रिकेटर नाराज
‘माझ्यातील धावांची भूक अजूनही संपलेली नाही,’ विश्वविक्रम करणाऱ्या ३८ वर्षीय क्रिकेटरची प्रतिक्रिया