---Advertisement---

‘जगदुनिया लक्षात ठेवेल, असं आयोजन करेल भारत…’, वर्ल्डकप 2023पूर्वी ‘दादा’चं ट्वीट चर्चेत

Sourav-Ganguly
---Advertisement---

क्रिकेटप्रेमींमध्ये वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेची उत्सुकता चांगलीच वाढत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 12 वर्षांनंतर भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकाची घोषणाही केली आहे. भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेची सुरुवात 8 ऑक्टोबर रोजी करणार आहे. या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली हादेखील सज्ज झाला आहे. त्याच्या मते, संपूर्ण जग अनेक वर्षे लक्षात ठेवेल अशाप्रकारे भारत विश्वचषकाचे आयोजन करेल.

काय म्हणाला दादा?
सौरव गांगुली (Sourav Ganguly) याने आयसीसी वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर ट्वीट केले. त्याने ट्वीटमध्ये लिहिले की, “भारतात होणाऱ्या विश्वचषकाकडे पाहत आहे. अध्यक्ष असताना कोरोनामुळे आधी स्पर्धेचा आनंद लुटू शकलो नव्हतो. काय शानदार स्पर्धा असेल ही. शानदार ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. भारतासारखे इतके ठिकाण इतर कुठल्याच देशाकडे नाहीयेत. बीसीसीआय या स्पर्धेचे आयोजन अशाप्रकारे करेल की, जगदुनिया ते लक्षात ठेवेल. जय शाह, रॉजर बिन्नी, सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे खूप खूप अभिनंदन.”

ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार पहिला सामना
भारतीय संघाला स्पर्धेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचा आहे. दोन्ही संघांमध्ये हा सामना 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या एम चिदंबरम क्रिकेट स्टेडिअममध्ये खेळला जाईल. भारतीय संघाचे चेपॉक मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्धचे आकडे शानदार आहेत. संघाने इथे 6 पैकी पाच सामन्यात विजयाची चव चाखली आहे.

कधी होणार अंतिम सामना?
आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेत भारतीय संघाला 15 ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध भिडायचे आहे. या सामन्याचे आयोजन अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) केले जाईल. विशेष म्हणजे, भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघ शेवटचे 2019च्या वनडे विश्वचषकात एकमेकांशी भिडले होते. या सामन्यात विराट कोहली याच्या नेतृत्वात भारतीय संघाने पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिला होता. (former BCCI President sourav ganguly on icc world cup 2023 said this know here)

महत्वाच्या बातम्या-
न थांबता सर्वाधिक कसोटी खेळणारा गोलंदाज! दुसऱ्या Ashes सामन्यात नेथन लायनचा महाविक्रम
लॉर्ड्स कसोटीत टॉसचा निकाल इंग्लंडच्या पारड्यात, कांगारुंचा हुकमी एक्का संघात परतला

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---