टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात इंग्लंडने भारतीय संघाचा 10 विकेट्सने दारुण पराभव केला होता. यापूर्वी आशिया चषक 2022मध्येही भारतीय संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचू शकला नव्हता. खूप कमी अंतराच्या कालावधीत दोन मोठ्या स्पर्धा झाल्या. त्यातही वाईटरीत्या बाहेर पडल्यामुळे आता रोहित शर्मा याच्या नेतृत्वावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या उपांत्य सामन्यातही भारतीय संघाने निराशाजनक कामगिरी केली होती. ते कोणत्याही वेळी संघर्ष करताना दिसले नव्हते. आता रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वावर भारतीय संघाचे माजी वेगवान गोलंदाज अतुल वासन (Atul Wassan) यांनी मत मांडले आहे.
काय म्हणाले अतुल वासन?
अतुल वासन यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले, “मला असे वाटते की, टी20 कर्णधार म्हणून रोहित शर्माचा काळ आता पूर्ण झाला आहे. तुम्ही नेहमीच दोन विश्वचषकाच्या मधला काळ पाहूनच योजना बनवता. मला वाटत नाही की, पुढील टी20 विश्वचषकासाठी त्याला कर्णधार म्हणून कायम ठेवले पाहिजे. कारण, यामुळे कोणताच फायदा होणार नाही. टी20 कर्णधार म्हणून तुमच्यासमोर हार्दिक पंड्या आणि रिषभ पंत यांच्या रूपात दोन पर्याय आहेत. तसं पाहिलं तर उपांत्य सामन्याबद्दल मला विश्वास बसत नाहीये की, नेमकं झालं तरी काय?”
‘रोहित मैदानावर लपायचं बघतो’
यादरम्यान अतुल वासन हे भारतीय संघावर खूपच निराश दिसले. ते म्हणाले की, “भारतीय संघाने काहीच संघर्ष केला नाही. इंग्लंडचा संघ जिंकला यावर काहीच चर्चा नकोय. मात्र, भारतीय संघ ज्याप्रकारे पराभूत झाला, ती खूपच चिंतेची बाब आहे.” वासन यांनी रोहित शर्माबद्दल वक्तव्य करताना म्हटले की, “कर्णधार म्हणून त्याने कुठलीच जबाबदारी घेतली नाही आणि सर्व निर्णय संघ व्यवस्थापनाद्वारे घेतले. माझ्या मते तुम्ही नेतृत्वावर कोणताही आरोप लावू शकत नाहीत. कारण, संघ व्यवस्थापनाने सर्व निर्णय घेतले होते. आमच्या कर्णधाराने कोणताही निर्णय घेतला नाही. तो फक्त मैदानावर कुठे लपायचे, एवढाच निर्णय घेत होता.”
अतुल वासन यांनी रोहित शर्मावर जोरदार टीका केली आहे. रोहितच्या टी20 विश्वचषकातील कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर त्याने संपूर्ण स्पर्धेत 6 सामने खेळताना 19.33च्या सरासरीने 116 धावा केल्या. यामध्ये फक्त एका अर्धशतकाचा समावेश होता. (former bowler atul wassan says that rohit sharma did not take a single call only decided where to hide on field)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्रीडा क्षेत्रात देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या 25 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर; अशी आहे यादी
एकीकडे पाकिस्तानी पत्रकाराचे ट्वीट, तर दुसरीकडे मिश्राजींचा ‘विराट’ रिप्लाय, ‘अशी’ केली बोलती बंद