भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) हा सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याला केवळ भारतातूनच नाही, तर जगभरातील क्रिकेट चाहत्यांकडून प्रेम मिळाले आहे. त्याच्याप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी चाहते विविध गोष्टी करत असतात. गुरूवारी (7 जुलै) देखील त्याच्या वाढदिवसानिमित्त भरभरुन शुभेच्छा त्याला मिळत आहेत.
धोनीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 538 सामने खेळले आहेत. त्याने त्याचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना 2019 च्या विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध उपांत्य फेरीमध्ये खेळला होता. या महत्वपूर्ण सामन्यात धोनी 50 धावा करुन बाद झाला होता.
धोनीने त्याच्या कारकिर्दीत 90 कसोटी सामने खेळले. यामध्ये त्याने 38.09 च्या सरासरीने 4876 धावा केल्या. यामध्ये त्याच्या 6 शतकांचा आणि 33 अर्धशतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे कसोटीत धोनीच्या एका द्विशतकाचाही समावेश आहे. त्याने 2013 सालामध्ये चेन्नईत झालेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध 224 धावांची खेळी केली होती.
तसेच धोनी सर्वाधिक वनडे सामने खेळणारा भारताचा सचिन तेंडूलकर नंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा क्रिकेटपटू आहे. धोनीने त्याच्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत 350 वनडे सामने खेळले असून यात त्याने 10 शतके आणि 63 अर्धशतकांसह 50.57 च्या सरासरीने 10773 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर भारताकडून धोनीने 98 टी-20 सामन्यात 2 अर्धशतकांसह 1617 धावा केल्या आहेत.
भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आणि दोनदा विश्वचषक जिंकलेल्या धोनीच्या कारकीर्दीतील काही ठळक कामगिरी पुढीलप्रमाणे …
डिसेंबर 2004: धोनीने बांगलादेश विरुद्ध चीतगाव (बांग्लादेश) मध्ये वनडे सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
एप्रिल 2005: त्याच्या वैयक्तिक 5 व्या वनडे सामन्यात त्याला पाकिस्तान विरूद्ध तिसर्या क्रमांकावर खेळण्यास मिळाली पहिल्यांदा संधी. या सामन्यापूर्वी धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4 सामन्यात फक्त 22 धावा केल्या होत्या. या सामन्यात विशाखापट्टनमच्या मैदानावर धोनीने 123 चेंडूंत 148 धावा केल्या.
ऑक्टोबर 2005: पुन्हा वरच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मिळाली संधी. श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्यात त्याने 145 चेंडूत 183 धावा केल्या. ही पाच सामन्यांची मालिका भारताने 3-0 जिंकली आणि धोनी या मालिकेत मालिकावीर ठरला.
डिसेंबर 2005: चेन्नई येथे श्रीलंकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये धोनीचे पदार्पण.
सप्टेंबर 2007: राहुल द्रविडकडून धोनीला वनडे क्रिकेटचे कर्णधारपद मिळाले.
सप्टेंबर 2007: धोनीने आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमधील एका डावात यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक बळी घेतलेल्या ऍडम गिलख्रिस्टच्या विक्रमाची बरोबरी केली.
सप्टेंबर 2007: दक्षिण आफ्रिकेतील पहिल्या टी-20 विश्वचषकामध्ये तो भारताचा कर्णधार होता. अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत केले. जोगिंदर शर्मासारख्या कमी अनुभवी गोलंदाजाला धोनीने अंतिम सामन्याचे अंतिम षटक टाकण्यास संधी दिली आणि तो मास्टरस्ट्रोक असल्याचे सिद्ध झाले.
ऑगस्ट 2008: श्रीलंकेमध्ये द्विपक्षीय मालिकेत धोनीने पहिल्यांदा भारताला विजय मिळवून दिला.
ऑगस्ट 2008: धोनीला राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार मिळाला.
नोव्हेंबर 2008: धोनी भारतीय संघाचा कसोटी कर्णधार झाला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपुरमध्ये झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात त्याला अनिल कुंबळेकडून कर्णधारपद मिळाले.
डिसेंबर 2008: धोनी आयसीसीचा वनडे क्रिकेटर ऑफ द इयर ठरला.
मार्च 2009: न्यूझीलंडमध्ये धोनीच्या नेतृत्वात भारताने प्रथमच द्विपक्षीय वनडे मालिका जिंकली.
एप्रिल 2009: धोनीला भारताचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री पुरस्कार मिळाला.
डिसेंबर 2009: सलग दुसऱ्यांदा आयसीसीचा सर्वश्रेष्ठ “वनडे क्रिकेटर ऑफ द इयर” पुरस्कार जिंकणारा धोनी पहिला खेळाडू ठरला.
मे 2010: चेन्नई सुपर किंग्ज संघाने धोनीच्या नेतृत्वात पहिल्यांदा आयपीएल विजेतेपद जिंकले.
एप्रिल 2011: विश्वचषक 2011 मधील अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध धोनीने 79 चेंडूत नाबाद 91 धावांची खेळी करून, 28 वर्षांनंतर भारताला विश्वचषक जिंकून दिला. ह्या सामन्यात धोनीने षटकार मारून विजय साजरा केला आणि या सामन्यात सामनावीर ठरला.
मे 2011: दुसऱ्यांदा चेन्नई सुपर किंग्ज संघाने धोनीच्या नेतृत्वात आयपीएल विजेतेपद जिंकले.
नोव्हेंबर 2011: भारतीय सैन्यदलात लेफ्टनन्ट कर्नलच्या मानद पदवीने सन्मानित करण्यात आले होते.
मार्च 2013: कर्णधार म्हणून 49 कसोटी सामन्यातील 21 वा विजय नोंदवून धोनीने माजी कर्णधार सौरभ गांगुलीचा विक्रम मोडीत काढला आणि भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार ठरला.
जून 2013: धोनीच्या नेतृत्वात भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. त्यावेळी आयसीसीच्या तीनही स्पर्धा जिंकणारा तो एकमेव कर्णधार ठरला.
फेब्रुवारी 2013: धोनीने कसोटी क्रिकेटमधील आपल्या कारकिर्दीतील एकमेव दुहेरी शतक झळकावले.
मार्च 2013: भारताने धोनीच्या नेतृत्वात भारतातील कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला 4-0 ने पराभूत केले.
एप्रिल 2014: धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला, परंतू अंतिम सामन्यात श्रीलंकेने विजय मिळवला.
डिसेंबर 2014: धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
मार्च 2015: धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2015 च्या विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात प्रवेश केला, पण उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव स्विकारावा लागला.
एप्रिल 2016: धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात प्रवेश केला, पण उपांत्य सामन्यात वेस्ट इंडिज विरुद्ध पराभव स्विकारावा लागला.
जानेवारी 2017: धोनीने मर्यादीत षटकांचे कर्णधारपद सोडले.
एप्रिल 2018: धोनीला “पद्मभूषण” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मे 2018: तिसऱ्यांदा चेन्नई सुपर किंग्ज संघाने धोनीच्या नेतृत्वात आयपीएल विजेतेपद जिंकले.
जुलै 2019: इंग्लंड आणि वेल्समध्ये आयोजित विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध उपांत्य फेरीत आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील अखेरचा वनडे सामना खेळला.
ऑगस्ट 2020: धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
ऑक्टोबर 2021: चौथ्यांदा चेन्नई सुपर किंग्ज संघाने धोनीच्या नेतृत्वात आयपीएल विजेतेपद जिंकले.
ऑक्टोबर-नोव्हेंबर 2021: युएईमध्ये झालेल्या आयसीसी टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाचा मेंटर म्हणून नियुक्त.
मार्च 2022: धोनी चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार.
एप्रिल 2022: रवींद्र जडेजाने चेन्नई सुपर किंग्ज संघाचे नेतृत्व पुन्हा एकदा धोनीला सोपवले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
वयाच्या २४व्या वर्षी कोट्यवधीत पैसे कमावतोय ‘हा’ भारतीय क्रिकेटर, नेटवर्थ ऐकून उडेल झोप
‘आयपीएल हंगाम संपूर्ण खेळता, पण भारताकडून खेळताना विश्रांती घेता’, रोहित-विराटवर चाहत्यांचा रोष
डोमेस्टिक क्रिकेटचे कोचिंग बादशाह चंद्रकांत पंडित