टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेला रविवारपासून (दि. 16 ऑक्टोबर) सुरुवात झाली. या दिवशी दोन सामने खेळवण्यात आले. हे सामने नामीबिया विरुद्ध श्रीलंका आणि यूएई विरुद्ध नेदरलँड्स संघात पार पडला. या दोन्ही सामन्यात नामीबिया आणि नेदरलँड्स संघांनी विजय मिळवले. यानंतर आता भारतीय संघाचे विश्वचषकातील अभियान सोमवारपासून (दि. 17 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यापासून होणार आहे. भारतीय संघ 2007नंतर म्हणजेच तब्बल 15 वर्षांनंतर पुन्हा एकदा विश्वचषक जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला पोहोचला आहे. रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. अशात आपल्या अभियानापूर्वी भारतीय खेळाडू घाम गाळत आहेत.
कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यांचा समावेश असलेला भारतीय संघ सराव सत्रादरम्यान नेट्समध्ये जोरदार तयारी करत आहे. अशातच सरावादरम्यान विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये तो सरावादरम्यान डान्स मूव्हज दाखवत आहे.
https://www.instagram.com/reel/Cjx4CMNpgCV/?utm_source=ig_embed&ig_rid=2c879afa-1985-4d92-9e1f-70592bbf5262
Virat Kohli having fun in the practice session. (Video by @OneCricketApp). pic.twitter.com/qzaULPHgAF
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 16, 2022
सोशल मीडियावर सराव सामन्यापूर्वी भारतीय संघ नेट्समध्ये घाम गाळतानाचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. मात्र, विराट कोहली याचा एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये तो भुवनेश्वर कुमार याच्यासोबत डान्स मूव्हज दाखवताना दिसत आहे. त्यांच्यासोबतच अर्शदीप सिंग आणि केएल राहुल हेदेखील मस्ती करताना दिसत आहेत. या व्हिडिओत विराट कोहली भुवनेश्वरला काहीतरी बोलतानाही दिसत आहे. त्यानंतर विराट डान्स मूव्हज दाखवून सांगतो आणि सर्वत्र एकच हशा पिकतो.
यानंतर केएल राहुलशी चर्चा करताना विराट डान्स करत त्याची नक्कल करताना दिसत आहे. त्याच्यासोबत बसलेला अर्शदीपही विराटचा डान्स पाहून लोटपोट होतो.
विराट सराव सामन्यांचा नव्हता भाग
टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ 7 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाला पोहोचला होता. भारतीय संघाने वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन सराव सामने खेळले आहेत. या दोन्ही सामन्यांमध्ये विराट सहभागी नव्हता. भारताने दोन्ही सामन्यांमध्ये युवा खेळाडूंना ऑस्ट्रेलियाच्या वातावरणाशी जुळवून घेण्याची संधी दिली होती. कर्णधार रोहित शर्मा पहिल्या सराव सामन्यात संघाचा भाग होता. पहिल्या सामन्यात भारताने शानदार विजय मिळवला होता, पण दुसऱ्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात केएल राहुल याने संघाचे नेतृत्व केले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मला कुणाचाही त्रास नाही’, विश्वचषकासाठी निवड न झाल्यानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार स्पष्टच बोलला
पियुष चावलाने पार केला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मैलाचा दगड! गुजरातवर सौराष्ट्रचा मोठा विजय