सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये महत्वाची मानली जाणारी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळली जात आहे. भारतीय संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज पियुष चावला या स्पर्धेत खेळत आहे. रविवारी (16 ऑक्टोबर) पियुष चावलाने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील एका मोठ्या विक्रमाची नोंद स्वतःच्या नावापुढे केली. त्याने या सामन्यात दिलेले योगदान सौराष्ट्र संघाला विजय मिळवून देण्यासाठी महत्वाचे होते.
रविवारी इंदोरच्या होळकर स्टेडियमवर हा सौराष्ट्र आणि गुजरात यांच्यातील सामना केळला गेला. या सामन्यात सौराष्ट्रने 3 विकेट्स राखून विजय मिळवला. विजय मिळवण्यासाठी पियुष चावला (Piyush Chawla) याचे योगदान देखील महत्वाचे ठरले. चावलाने या 20 षटकांच्या सामन्यात एकूण चार षटके गोलंदाजी केली. या चार षटकांमध्ये त्याने 26 धावा खर्च केल्या आणि दोन विकेट्स घेतल्या. या दोन विकेट्सच्या जोरावर त्याने स्वतःच्या 100 विकेट्स पूर्ण केल्या. आता त्याच्या नावावर एकूण 101 विकेट्स झाल्या आहेत.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांचा विचार केला, तर पियुष चावरा आता 101 विकेट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. यादीत दुसऱ्या क्रमांकावर जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat) आहे, ज्याने मुश्ताक अली ट्रॉफीत आतापर्यंत एकूण 95 विकेट्स घेतल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर सिद्धार्थ कौल (Siddarth Kaul) आहे, ज्याने या स्पर्धेत आतापर्यंत 94 विकेट्स घेतल्या आहेत. छमा मिलिंद (Chama Milind) या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे, ज्याने आतापर्यंत 86 विकेट्स घेतल्या आहेत. यादीत पाचव्या क्रमांकावर अनिकेत चौधरी (Aniket Choudhary) आहे, ज्याने या स्पर्धेत 85 विकेट्स घेतल्या आहेत.
A special ????! ???? ????
Congratulations to Piyush Chawla as he scalps his 1⃣0⃣0⃣th wicket in #SyedMushtaqAliT20. ???? ????
Follow the match ▶️ https://t.co/RUjNxTeZB1 #GUJvSAU | @GCAMotera | @mastercardindia pic.twitter.com/7gwsyN21iX
— BCCI Domestic (@BCCIdomestic) October 16, 2022
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणार खेळाडू
101 – पियुष चावला
95 – जयदेव उनाडकट
94 – सिद्धार्थ कौल
86 – छमा मिलिंद
85 – अनिकेत चौधरी
दरम्यान, सौराष्ट्र आणि गुजरात यांच्यातील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर सौराष्ट्रने नाणेफेक जिंंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या गुजरात संघाने 7 विकेट्सच्या नुकसानावर 162 धावा केल्या. प्रत्युत्तरात सौराष्ट्रने 19 षटकांमध्ये 7 विकेट्सच्या नुकसानावर 164 धावा केल्या. सौराष्ट्रसाठी या सामन्यात दोन विकेट्स घेणाऱ्या पियुष चावलाने आंतररष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी 3 कसोटी, 25 एकदिवसीय आणि 7 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
व्हिडिओ: धवनला न विचारताच वडिलांनी ठरवलं लग्न! वरून लेकालाच मारला जबरदस्त डायलॉग
धवनने ज्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये दिली नाही जागा, त्यानेच ठोकल्या 11 चेंडूत 62 धावा