भारतीय क्रिकेट संघात असे अनेक खेळाडू आहेत, जे त्यांच्या विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखले जातात. मात्र, यामध्ये असेही काही खेळाडू आहेत, जे क्रिकेटव्यतिरिक्त त्यांच्या मजेशीर अंदाजासाठीही ओळखले जातात. यामध्ये भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन याचाही समावेश आहे. धवन त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे भलताच चर्चेत असतो. कधी तो संघसहकाऱ्यांसोबत व्हिडिओ बनवतो, तर कधी बॉलिवूड कलाकारांसोबत. अशात आता त्याने वडिलांसोबतचा एक रील बनवला आहे. त्यामध्ये तो शानदार अभिनय करताना दिसला आहे. या व्हिडिओत त्याचे वडीलही जबरदस्त डायलॉग बोलताना दिसत आहेत.
सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) याने शेअर केलेले रील सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओत धवन त्याच्या वडिलांना विचारत आहे की, तुम्ही मला न विचारता माझे लग्न कसे काय ठरवू शकता. याचे उत्तर देताना त्याचे वडील जबरदस्त डायलॉग बोलताना दिसतात. 35 वर्षीय धवनने आपल्या वडिलांच्या अभिनयावर या व्हिडिओला कॅप्शन देत लिहिले की, “भारी खेळलात बाबा.” त्याचा हा व्हिडिओ तब्बल 23 लाखांहून अधिक चाहत्यांनी पाहिला.
शिखर धवनच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकाविजय
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात नुकतीच वनडे मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व शिखर धवन करत होता. धवन आणि त्याच्या नेतृत्वाखालील संघाने ही मालिका 2-1ने आपल्या नावावर केली होती. मात्र, पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात भारताने दमदार पुनरागमन करत मालिका आपल्या नावावर केली.
शिखर धवनने विजयानंतर शेअर केले रील
शिखर धवन याच्या इंस्टाग्रामबद्दल बोलायचं झालं, तर त्याला इंस्टाग्रामवर 11.5 मिलियन म्हणजेच जवळपास 1 कोटींहून अधिक चाहते फॉलो करतात. त्यामुळेच कदाचित त्याच्या प्रत्येक पोस्टला लाखो लाईक्स मिळत असतात. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर खेळाडूंसोबत जबरदस्त डान्स केला होता.
हा व्हिडिओही त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला होता. या व्हिडिओला 84 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि 12 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धवनने ज्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये दिली नाही जागा, त्यानेच ठोकल्या 11 चेंडूत 62 धावा
शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात नेदरलँड्सचा दमदार विजय, यूएईचा 3 विकेट्सने पराभव