घरच्या मैदानावर भारतीय पुरूष क्रिकेट संघाने शिखर धवन याच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका खेळली. ही मालिका भारताने 2-1ने जिंकली. या मालिकेसाठी भारताच्या संघात रजत पाटीदार, मुकेश कुमार आणि राहुल त्रिपाठी यांची निवड केली गेली, मात्र या तिघांनाही बाकावरच बसून राहावे लागले. त्यामुळे त्यांचे आंतरराष्ट्रीय पदार्पण लांबले. त्यातील एका खेळाडूने निराश न होता देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याची विलक्षण कामगिरी सुरूच ठेवली आहे.
भारताच्या स्थानिक क्रिकेटमधील महत्वाची स्पर्धा सईद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) खेळली जात आहे. या स्पर्धेत रविवारी (16 ऑक्टोबर) मध्य प्रदेश आणि रेल्वे यांच्यात राजकोट येथे सामना खेळला गेला. या सामन्यात मध्य प्रदेशचा कर्णधार आदित्या श्रीवास्तव याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी रजत पाटीदार (Rajat Patidar) याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली. तो त्याच्या विस्फोटक खेळीसाठी ओळखला जातो. तसेच मागील काही सामन्यांमध्ये त्याने धावांचा पाऊस पाडला आहे. तोच फॉर्म कायम राखत त्याने रेल्वेविरुद्ध 213.95च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली.
रजतने 43 चेंडूत 2 चौकार आणि 9 षटकार खेचत नाबाद 92 धावा केल्या. यामुळे त्याचा 62 धावा केवळ 11 चेंडूतच आल्या आहेत. तसेच त्याचे शतक केवळ 8 धावांनी राहिले. त्याच्यासाठी 2022 वर्ष उत्तम राहिले आहे. त्याने आयपीएलमध्ये बेंगलोर रॉयल चॅलेंजर्सकडून क्वालिफायरच्या सामन्यात वादळी खेळी केली होती. त्यानंतर तो रणजी ट्रॉफी 2022च्या अंतिम सामन्यात शतकी खेळी करत मध्य प्रदेशला पहिल्यांदा चॅम्पियन बनवण्यात महत्वाची भुमिका बजावली होती.
रजतबरोबर वेंकटेश अय्यर यानेही रेल्वेविरुद्ध चांगली फलंदाजी केली. त्याने 22 चेंडूत 3 चौकार आणि एक षटकार मारत 28 धावा केल्या. त्यामुळे मध्य प्रदेशने 20 षटकात 5 विकेट्स गमावत 190 धावसंख्या उभारली. लक्ष्याचा पाठलाग करताना रेल्वेचा संघ 20 षटकात 9 विकेट्स गमावत 176 धावांपर्यंत मजल गाठू शकला. त्यामुळे मध्य प्रदेशने हा सामना 14 धावांनी जिंकला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात नेदरलँड्सचा दमदार विजय, यूएईचा 3 विकेट्सने पराभव
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी: महाराष्ट्राचा सलग दुसऱ्या सामन्यात दणदणीत विजय; मुंबईचा विजयी चौकार