भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. बुधवारपासून (दि. 07 जून) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023चा अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाचा भाग असलेल्या विस्फोटक फलंदाज विराट कोहली याच्याविषयी मोठी प्रतिक्रिया आली आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी विराटविषयी मोठे वक्तव्य केले. त्यांनी मैदानावरील विराटच्या आक्रमकतेचे कौतुक केले. तसेच, बीसीसीआयने विराटला वनडे क्रिकेट प्रकारात संघाचा कर्णधार कायम न ठेवून अन्याय केल्याचेही म्हटले.
जस्टीन लँगर (Justin Langer) यांनी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात चालू असलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2021-23च्या अंतिम सामन्यादरम्यान हे लक्षवेधी भाष्य केले आहे. लँगर हे समालोचन पॅनेलचे भाग आहेत. त्यांनी विराट कोहली (Virat Kohli) याच्या खेळातील आवडीचे कौतुक केले. यावेळी त्यांनी विराटकडून वनडे कर्णधारपद काढून घेतल्यामुळेही बीसीसीआय (BCCI) बोर्डाला सुनावले.
काय म्हणाले लँगर?
डब्ल्यूटीसी अंतिम (WTC Final) सामन्यात समालोचन करताना ते म्हणाले की, “मला त्याची आक्रमकता खूपच आवडते. बीसीसीआयने त्याच्यावर अन्याय केला आणि मला दुसरं काहीच ऐकायचं नाही. जर त्याला वनडेत नेतृत्व करायचे होते, तर त्याला सन्मानाने कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडू द्यायची होती.”
पुढे बोलताना लँगर म्हणाले की, “विराट कोहलीविषयी अशी कोणतीच गोष्ट नाहीये, जी मला आवडत नाही. त्याची आवड, त्याची फलंदाजी. तो शानदार कर्णधार होता.”
डिसेंबरमध्ये काढून घेतले कर्णधारपद
विराट कोहली याच्याकडून डिसेंबर 2021मध्ये वनडे कर्णधारपद काढून घेतले होते. तसेच, रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली. वनडे क्रिकेटमध्ये नेतृत्व करताना विराटने 70.43च्या शानदार विजयी टक्केवारीसह 95 सामन्यांपैकी 65 सामने भारताला जिंकून दिले.
भारताचे डब्ल्यूटीसी किताबावर लक्ष
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 7 जूनपासून डब्ल्यूटीसी अंतिम सामना खेळला जात आहे. विशेष म्हणजे, भारताची डब्ल्यूटीसी अंतिम सामना खेळण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2019-21च्या डब्ल्यूटीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचे नेतृत्व विराट कोहली याच्याकडे होते. मात्र, अंतिम सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून पराभूत व्हावे लागले होते.
अशात लंडनच्या के ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 3 विकेट्स गमावत 327 धावा केल्या. या सामन्यात भारतीय संंघ दमदार पुनरागमन करून सामना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करेल. (Justin Langer On Virat Kohli’s captaincy during WTC Final 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ICC बादफेरीत चमकला स्मिथ, ‘या’ विक्रमात कॅलिस-संगकाराची बरोबरी, पण विराटचा रेकॉर्ड मोडण्यात अपयशी
WTC फायनलच्या पहिल्या शतकाचा मानकरी ठरला हेड, 1 षटकार आणि 14 चौकार ठोकत रचला इतिहास