भारताचा वेगवान गोलंदाज अशोक दिंडाने मागील महिन्यातच क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर त्याने राजकारणाच्या पिचवर आपली दुसरी इनिंग सुरू केली. अशोक दिंडाने भाजपमध्ये प्रवेश केला. सध्या पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांसाठी तो भाजपचा प्रचार करतो आहे.
तसेच यंदाच्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत अशोक दिंडा भाजपकडून मोयना मतदार संघातून निवडणूक देखील लढवत आहे. मात्र आता याच दरम्यान त्याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याचे वृत्त समोर येत आहे. दिंडा आपल्या प्रचारासाठी जात असतांना ही घटना घडली.
अशोक दिंडा आपल्या प्रचारासाठी जात असतांना काही अज्ञात माणसांनी त्याच्या कारवर हल्ला केला. या हल्लेखोरांनी त्याच्या कारवर दगडफेक केली. मात्र सुदैवाने दिंडाला यात गंभीर दुखापत झाली नाहिये. परंतु त्याच्या कारच्या काचा तुटल्याचे तसेच कारच्या सीटवर दगड विखुरल्याचे छायाचित्र सदर घटनेनंतर समोर आले आहे.
दिंडाने व्हिडिओ केला शेअर
अशोक दिंडाने सादर घटनेचा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. यात दिंडाच्या कारवर दगडफेक होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच या दगडफेकीनंतर कारचे झालेले नुकसान देखील स्पष्ट दिसत आहे.
গণতন্ত্রকে প্রহসনে পরিণত করেছে দিদির সরকার।@BJP4India @BJP4Bengal pic.twitter.com/CezTDb3uED
— Ashoke Dinda (@dindaashoke) March 30, 2021
अशोक दिंडाने फेब्रुवारी महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केला होता. दिंडाने पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो आणि पक्षाचे उपाध्यक्ष अर्जुन सिंह यांच्या उपस्थितीत भाजपचे सदस्यत्व स्वीकारले होते.
महत्वाच्या बातम्या:
फक्त ९० मिनिट! यावर्षी आयपीएल होणार या नव्या नियमासह
असे कुठे असते होय! आव्हान माहित नसतानाच फलंदाजांनी केली दिड षटके फलंदाजी
ना धोनी ना रोहित ना कोहली; हे आहेत आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज