भारतीय संघाचे माजी दिग्गज खेळाडू दिलीप वेंगसरकर यांच्या मते भारतीय संघाला लवकरच नवीन एमएस धोनी मिळणार आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय संघ त्याची कमी भरण्यासाठी चांगल्या फिनिशरचा शोध घेत आहे. परंतु संघाला अद्याप असा एकही फिनिशर मिळाला नाहीये, जो ही जबाबदारी धोनीप्रमाणे पार पाडू शकला आहे. वेंगसरकरांच्या मते सूर्यकुमार यादव भारतासाठी एक चांगला फिनिशर बनू शकतो.
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याला आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्यासाठी खूप वाट पाहावी लागली. पण जेव्हापासून त्याने भारतासाठी पदार्पण केले आहे, तेव्हापासून त्याची बॅट शांत झालेली नाही. त्याने एकदिवसीय आणि टी-20 फॉरमॅटमध्ये भारताच्या संघात पक्के स्थान बनवले आहे. आयसीसीच्या टी-20 क्रमवारीत सध्या तो चौथ्या क्रमांकावर आहे आणि आयपीएलमध्ये खेळण्याचा मोठ्या अनुभव त्याच्याकडे आहे. टी-20 क्रिकेटमध्ये त्याला हा अनुभव नेहमीच कामी आला आहे.
आशिया चषकातील खराब प्रदर्शनानंतर भारतीय संघाच्या फलंदाजी क्रमाची चर्चा होत आहे. याच पार्श्वभूमीवर दिलीप वेगसरकर (Dilip Vengsarkar) म्हणाले की, “मी यावषीय काही बोलू शकत नाही की, कोणी कोणत्या क्रमांकावर खेळले पाहिजे. प्रशिक्षक, कर्णधार आणि उपकर्णधार यांचा हा निर्णय आहे. असे असले तरी, मला वाटते सूर्यकुमार यादव जो चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे, तो पाचव्या क्रमांकावर देखील खेळू शकतो. तो एक चांगला फिनिशर बनू शकतो. टी-20 एकदिवसय आणि कसोटी क्रिकेटसारखे नाहीये, जिथे प्रत्येक क्रमांकावर खेळण्यासाठी खेळाडू ठरलेले असतात. या फॉरमॅटमध्ये कोणीही कुठेही खेळू शकतो. तुम्हाला सेट होण्यासाठी वेळ मिळत नाही. पहिल्या चेंडूपासून तुम्हाला आक्रमण करावे लागते.” वेंगसरकरांच्या मते वरच्या फळीत मात्र रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली यांनीच खेळले पाहिजे.
या खेळाडूंना मिळाली पाहिजे होती संधी-ॆ
वेंगसरकर वेंगसरकर वेगवान गोलंदाज उमरान मलिक आणि युवा फलंदाज शुमन गिल यांना संघात न घेतल्यामुळे देखील हैराण आहेत. तसेच मोहम्मद शमी या संघात नसल्यामुळे देखील त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. तो म्हणाले, “मी असतो तर मोहम्मद शमी, उमरान मलिक आणि शुबमन गिल यांना संघात निवडले असते.” दरम्यान, गिलने आयपीएलच्या मागच्या हंगामात खेळलेल्या 16 सामन्यांमध्ये 483 धावा केल्या होत्या. तसेच उमरान मिलकने देखील दुसरा सर्वात वेगवान चेंडू टाकून सर्वांचा थक्क केले होते. मोहम्मद शमी देखील चांगल्या लयीत गोलंदाजी करताना दिसला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
दिग्गजांचे द्वंद्व हुकले! पावसाच्या व्यत्ययाने इंडिया लिजेंड्स विरूद्ध वेस्ट इंडिज लिजेंड्स सामना रद्द
टी-20 विश्वचषकासाठी किती भक्कम आहे भारतीय संघ? जाणून घ्या ताकत आणि कमजोरी
पाकिस्तानच्या शाळांमध्ये विद्यार्थी गिरवतायेत बाबर आझमचे धडे, सर्वत्र रंगलीये चर्चा





