---Advertisement---

विराट-नवीन वादावर गंभीरने पुन्हा काढला राग; आता तर म्हणाला, ‘कुणीही येऊन माझ्या खेळाडूंना…’

On: शनिवार, डिसेंबर 9, 2023 9:45 AM
Gautam-Gambhir-And-Virat-Kohli
---Advertisement---

क्रिकेट खेळात खेळाडू आणि वाद आता सामान्य बाब झाली आहे. खेळाडूंमध्ये वाद झाल्यानंतर त्याविषयीच्या चर्चा दीर्घकाळ होतात. अशात इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेदरम्यान विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात झालेला वादही पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आयपीएल 2023 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघातील एका सामन्यात दोन्ही खेळाडू आपसांत भिडले होते. सामन्यानंतरही दोघांमध्ये बाचाबाची झाली होती, ज्यामुळे या वादात लखनऊचा मार्गदर्शक गौतम गंभीर यानेही उडी घेतली होती. मात्र, नुकत्यात दिलेल्या एका मुलाखतीत गंभीरने या वादावर मोकळेपणाने चर्चा केली.

भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीर (Gautam Gambhir) याच्या मते, कोणीही येऊन त्याच्या खेळाडूंना दमदाटी करू शकत नाही. तो असेही म्हणाला की, सामन्यादरम्यान जे घडले, त्यात त्याने हस्तक्षेप केला नाही, पण सामना झाल्यानंतर त्याला आपल्या खेळाडूंचा बचाव करण्याचा पूर्ण अधिकार आहे.

एका पॉडकास्टशी बोलताना गंभीर म्हणाला की, “एक मार्गदर्शक म्हणून कोणीही येऊन माझ्या खेळाडूंवर दबाव टाकू शकत नाही. माझी धारणा खूपच वेगळी आहे. जोपर्यंत सामना सुरू होता, मला हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार नव्हता. एकदा सामना संपल्यानंतर, जर कुणी माझ्या खेळाडूंसोबत बाचाबाची केली, तर मला त्याचा बचाव करण्याचा पूर्ण अधिकार आहे.”

रंजक बाब म्हणजे, गौतम गंभीर आणि विराट कोहली (Gautam Gambhir And Virat Kohli) यांच्यात बाचाबाची होण्याची ही पहिली वेळ नव्हती. गंभीर जेव्हा खेळायचा, तेव्हा आयपीएल 2013 दरम्यान तो आरसीबीचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) याच्याशी भिडला होता.

श्रीसंत आणि गंभीर वाद
तसेच, नुकत्यात क्रिकेट मैदानावर त्याचा माजी सहकारी एस श्रीसंत याच्याशी वाद झाला होता. लीजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेतील एलिमिनेटर सामन्यादरम्यान दोन्ही खेळाडू भिडले होते. त्यानंतर श्रीसंतने सोशल मीडियावरून खुलासा केला की, गंभीरने सामन्यादरम्यान त्याला ‘फिक्सर’ म्हटले होते. (former cricketer gautam gambhir again vented out his anger on virat kohli naveen ul haq controversy read more)

हेही वाचा-
दक्षिण आफ्रिका संघाला मोठा झटका, प्रमुख खेळाडू भारताविरुद्धच्या मालिकेतून बाहेर
‘कसोटी क्रिकेटच्या अस्तित्वाला धोका…’, श्रीलंकेन दिग्गजाच्या विधानाने वेधले क्रिकेटप्रेमींचे लक्ष, वाचा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---