Gautam Gambhir On Player of The Match: भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीर त्याच्या परखड मतांसाठी आणि निर्भीड व्यक्तिमत्त्वासाठी ओळखला जातो. तो नेहमीच त्याच्या विधानांनी सर्वांच्या भुवयाही उंचावतो. अशातच त्याने पुन्हा एकदा आपल्या विधानाने क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधले आहे. यावेळी त्याने समालोचकांवर निशाणा साधला आहे. त्याने म्हटले आहे की, समालोचकांनी प्लेयर ऑफ द मॅच निवडला नाही पाहिजे.
काय म्हणाला गंभीर?
माजी फलंदाज आणि समालोचक गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने नुकतेच एका क्रिकेट वेबसाईटशी बोलताना क्रिकेट नियमात बदल करण्याविषयी भाष्य केले. त्याच्या मते, समालोचकांनी प्लेयर ऑफ द मॅच निवडला (Player of the Match) नाही पाहिजे. गंभीरनुसार, पराभूत होणाऱ्या संघाच्या कर्णधाराने किंवा प्रशिक्षकानेच हा निर्णय घेतला पाहिजे.
गंभीर म्हणाला, “समालोचकांनी प्लेयर ऑफ द मॅचची निवड केली नाही पाहिजे. मी पण एक समालोचक आहे आणि समालोचक पक्षपात करू शकतात. हे रोखले पाहिजे. त्यामुळे पराभूत झालेल्या संघाच्या प्रशिक्षकाने किंवा कर्णधाराने प्लेयर ऑफ द मॅच निवडला पाहिजे.”
Gambhir said "Commentators shouldn't be deciding the Player of the match, I am also a commentator and they can be biased, it should be stopped – so it should be losing team's coach or captain should be selecting the Player of the match award". [Sportskeeda] pic.twitter.com/i5cC90kN43
— Johns. (@CricCrazyJohns) December 27, 2023
विराटसोबतच्या वादावर गंभीरचा खुलासा
अलीकडेच गंभीरने विराट कोहली (Virat Kohli) याच्यासोबतच्या वादावरही मोठा खुलासा केला होता. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात त्याने विराट कोहलीसोबतच्या वादावर विधान केले होते. त्यात होस्ट त्याला विचारतो की, विराटने कोणत्या गोलंदाजाच्या चेंडूवर वनडेतील 50वे शतक केले होते? यावर त्याने लॉकी फर्ग्युसनचे नाव घेतले होते. त्यानंतर गंभीरने हसत म्हटले होते की, “माझा वाद फक्त मैदानावर आहे.”
गंभीरच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून त्याच्यासाठी अनेक चांगल्या प्रतिक्रियाही आल्या होत्या. कारण, नेहमीच विराटवर निशाणा साधणाऱ्या गंभीरने विराटविषयी असे विधान करून प्रेक्षकांची मने जिंकली होती. (former cricketer gautam gambhir said that commenters should not select player of the match)
हेही वाचा-
मोठी बातमी: हार्दिक पंड्या अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेतून Ruled Out! पण IPL 2024 साठी उपलब्ध
एकच मारला, पण सॉलिड मारला! मॅक्सवेलचा 92 मीटरचा षटकार थेट स्टेडिअमच्या छतावर, व्हिडिओ पाहाच