भारतीय क्रिकेट संघ द्विपक्षीय मालिकांमध्ये चांगली कामगिरी करत आहे, पण आयसीसी स्पर्धांमध्ये भारतीय संघ सातत्याने खराब प्रदर्शन करताना दिसत आहे. भारताच्या या कामगिरीवर माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने जे काही म्हटले आहे, त्याची जोरदार चर्चा रंगली आहे. त्याने आयपीएलवर नाही, तर खेळाडूंवर निशाणा साधला आहे. चला तर गंभीर काय म्हणालाय जाणून घेऊयात…
खरं तर, भारतीय संघाने 2013नंतर एकही आयसीसी स्पर्धा जिंकली नाहीये. भारतीय संघाला सातत्याने उपांत्य किंवा अंतिम सामन्यात पराभवाचा धक्का मिळाला आहे. दुसरीकडे, अनेक माजी दिग्गजांनी यासाठी आयपीएलला जबाबदार ठरवले आहे. त्यांच्या मते, आयपीएल (IPL) खेळल्यामुळे खेळाडू दमून जातात आणि त्यानंतर त्यांना आयसीसी (ICC) स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करताना फेल ठरतात. मात्र, गौतम गंभीर (Gautam Gambhir) याचे मत यापेक्षा वेगळे आहे.
‘आयपीएलवर प्रश्न उपस्थित करणे योग्य नाही’
नवी दिल्ली येथील एका कार्यक्रमात गंभीर म्हणाला की, “भारतीय क्रिकेटमधील सर्वात चांगली गोष्ट आयपीएल आहे. हे माझे मत आहे. जेव्हाही भारतीय संघ चांगली कामगिरी करत नाही, तेव्हा लोक आयपीएलला जबाबदार ठरवतात, जे योग्य नाहीये. जर आपण आयसीसी स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करू शकलो नाही, तर खेळाडूंना आणि त्यांच्या कामगिरीला जबाबदार ठरवा. आयपीएलवर बोट दाखवणे योग्य नाहीये.”
आयसीसी विश्वचषक स्पर्धेतील भारताची कामगिरी
भारतीय संघाला अनेकदा उपांत्य आणि अंतिम सामन्यात पोहोचूनही विजेतेपद पटकावता आले नाही. भारतीय संघाने 2014च्या टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. मात्र, त्यांना श्रीलंका संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. दुसरीकडे, 2015च्या विश्वचषकातही भारत उपांत्य सामन्यात पराभूत झाला होता. 2016च्या टी20 विश्वचषकातही पराभवाचा सामना करावा लागला होता. याव्यतिरिक्त 2019च्या विश्वचषक उपांत्य सामन्यात संघाला पराभूत व्हावे लागले होते. 2021च्या टी20 विश्वचषकातही संघ पहिल्या दौऱ्यातूनच बाहेर झाला होता. तसेच, यावर्षीही भारत उपांत्य सामन्यात इंग्लंडकडून पराभूत होऊन स्पर्धेतून बाहेर पडला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तब्बल 17 वर्षांनी रंगणार इंग्लंड-पाकिस्तान कसोटीचा थरार; स्टोक्स सेना पाकिस्तानमध्ये दाखल
भारताच्या ‘या’ खेळाडूचा नादच खुळा! वनडे ओपनर म्हणून ‘मोठ्या’ विक्रमात सचिन-रोहित अन् धवनलाही पछाडलं