इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत पोहोचण्यासाठी सर्वच संघ जीवतोड मेहनत घेताना दिसत आहेत. सध्या आयपीएल 2023 स्पर्धेतील गुणतालिकेत अव्वल 4 स्थान अनुक्रमे गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स संघांनी काबीज केले आहे. मात्र, इतर संघांचे पर्यायही सध्या खुले झाले आहेत. अशातच भारतीय संघाचा माजी खेळाडू हरभजन सिंगने भविष्यवाणी केली आहे. त्याने आयपीएल 2023 प्ले-ऑफमध्ये पोहोचणाऱ्या चार संघांची नावे सांगितली आहेत.
स्टार स्पोर्ट्सवर समालोचन करताना हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने एका क्रिकेट चाहत्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना प्ले-ऑफमध्ये पोहोचणाऱ्या चार संघांची नावे घेतली. हरभजन सिंग भविष्यवाणी (Harbhajan Singh Prediction) करत म्हणाला की, हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ यावेळी प्ले-ऑफमध्ये जागा बनवतील. मात्र, हरभजन असेही म्हणाला की, राजस्थान रॉयल्स संघही प्ले-ऑफच्या आसपास राहील, पण मुंबई इंडियन्स संघ त्यांच्या पुढे निघून प्ले-ऑफमध्ये पोहोचेल.
हरभजन सिंग म्हणाला की, “मुंबई इंडियन्स संघ आता खाली नाहीये, पण हा संघ पुनरागमन करत आहे आणि हा प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्यात यश मिळवेल.”
धोनीच्या निवृत्तीवर हरभजनचे भाष्य
आयपीएल 2023च्या प्ले-ऑफ भविष्यवाणीनंतर हरभजन महेंद्र सिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) याच्या निवृत्तीविषयीही बोलला. तो म्हणाला की, “फक्त धोनीलाच माहिती आहे की, तो कधी निवृत्त होणार आहे.” तो म्हणाला की, “मी मागील वर्षी म्हणालो होतो की, धोनी यावर्षी खेळेल, पण मला आता तो पुढील वर्षी खेळेल की नाही माहिती नाही.”
धोनीचे वक्तव्य
धोनीने लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्धच्या सामन्यादरम्यान जेव्हा समालोचक डॅनी मॉरिसन यांनी त्याच्या निवृत्तीविषयी विचारले, तेव्हा धोनीने मजेशीर उत्तर दिले. मॉरिसन म्हणाले की, “हा तुमच्या कारकीर्दीतील शेवटचा सामना सुरू आहे.” यावर धोनी त्यांना म्हणाला की, “हे माझे शेवटचे आयपीएल आहे, हे तुम्हीच ठरवले आहे, मी नाही.”
खरं तर, लखनऊच्या इकाना स्टेडिअमवरील लखनऊ सुपर जायंट्स वि. चेन्नई सुपर किंग्स (Lucknow Super Giants vs Chennai Super Kings) संघातील सामना पावसामुळे पार पडू शकला नाही. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण देण्यात आले. (former cricketer harbhajan singh big prediction for ipl 2023 playoff teams)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धवनचा सल्ला घेत रोहितसेनेने पंजाबला त्यांच्याच मैदानात चारली धूळ; टॉसवेळी झालेल्या चर्चेचं भांडं फुटलं
मुंबईच्या माथ्यावर विजयी तिलक! सलग दुसऱ्या सामन्यात सहज पार केले 215 चे आव्हान, ईशान-सूर्याचा झंझावात