भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा 10 डिसेंबरपासून 3 सामन्यांच्या टी20 मालिकेने सुरू होणार आहे. या दौऱ्यात टी20 व्यतिरिक्त 3 वनडे आणि 2 कसोटी सामनेही खेळले जाणार आहेत. यातील वनडे मालिकेसाठी भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू युझवेंद्र चहल याला निवडले आहे. मात्र, माजी फिरकीपटू हरभजन सिंग निवडकर्त्यांच्या या निर्णयाने खुश नाहीये. त्याने म्हटले आहे की, चहलला लॉलीपॉप दिले आहे. कारण, तो टी20चा शानदार गोलंदाज आहे आणि त्या प्रकारात त्याला संघात जागा दिली नाहीये.
खरं तर, युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) हा ऑगस्ट 2023मध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर अखेरचा टी20 सामना खेळला होता. त्यानंतर त्याची भारतीय टी20 संघात निवड झाली नाही. तसेच, वनडे क्रिकेटमध्येही त्याला आशिया चषक आणि विश्वचषक संघातही जागा मिळाली नव्हती. आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी त्याची वनडे संघात निवड झाली आहे, पण टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धा लक्षात घेता, आता वनडे सामन्यांना तितके महत्त्व नाहीये.
‘चहल टी20 संघातही असायला पाहिजे होता’
हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने त्याच्या युट्यूब चॅनेलवर शेअर केलेल्या व्हिडिओत युझवेंद्र चहलविषयी प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “टी20 क्रिकेट प्रकारात युझवेंद्र चहल नाहीये. तुम्ही त्याला वनडे संघात सामील केले, पण टी20 संघात जागा दिली नाहीये. तुम्ही त्याला लॉलीपॉप दिलंय. ज्या क्रिकेट प्रकारात तो चांगले खेळतो, त्यात त्याला खेळवणार नाही, बाकी प्रकारात खेळवणार. हे माझ्या समजण्याच्या पलीकडचे आहे.”
खरं तर, भारतीय क्रिकेट संघ 10 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात करेल. सर्वप्रथम टी20 मालिका खेळली जाईल. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 3 टी20, 3 वनडे आणि 2 कसोटी सामने खेळले जातील. वनडे मालिकेची सुरुवात 17 डिसेंबरपासून होईल. यातील 3 सामने 17, 19 आणि 21 डिसेंबरपासून खेळले जातील. वनडे संघाचे नेतृत्व अनुभवी यष्टीरक्षक केएल राहुल याच्या खांद्यावर सोपवण्यात आले आहे. सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि साई सुदर्शन यांनाही संधी मिळेल, तर तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग आणि श्रेयस अय्यर यांनाही संगात सामील केले गेले आहे. (former cricketer harbhajan singh reacts to yuzvendra chahal s snub from ind vs sa t20is)
हेही वाचा-
दिल्लीने दिला होता डिविलियर्सला धोका? 13 वर्षे जुना किस्सा सांगत ‘मिस्टर 360’ म्हणाला, ‘त्यांनी मला…’
नागराज मंजुळेंनी शड्डू ठोकला! बहुचर्चित ‘खाशाबा’ सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात