वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा सुरू असताना भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला लग्नाची मागणी घालणारी अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनेत्री पायल घोष हिने शुक्रवारी (दि. 1 डिसेंबर) सकाळी एक ट्वीट करत क्रिकेट आणि बॉलिवूडविश्वात खळबळ माजवली आहे.
अभिनेत्री पायल घोष (Payal Ghosh) हिने तिच्या ट्वीटमध्ये भारताचा दिग्गज खेळाडू इरफान पठाण (Irfan Pathan) याला आपला बॉयफ्रेंड म्हटले आहे. तसेच, हेही म्हटले की, तिचे आणि इरफानचे अफेअर जवळपास 5 वर्षे सुरू होते. त्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले.
‘इरफानला पाच वर्षे डेट केले’
तिने ट्वीटमध्ये स्पष्ट केले की, मोहम्मद शमी (Mohammed Shami) याच्याशी लग्न करणारे ट्वीट मजेत केले होते. तिने एका युजरला उत्तर देताना लिहिले की, “अरे भावा ते ट्वीट मी मजेत केले होते. मला शमी-वमीसोबत लग्न करायचे नाहीये. मला साधा मुलगाही चालेल, तोही लॉयल असला पाहिजे. हेही ऐकून घे की, मी इरफान पठाण (Irfan Pathan) याला 5 वर्षे डेट केले आहे. त्यानंतर सर्व संपले. मी कोणावरही सहजरीत्या विश्वास ठेवत नाही.”
Areee bhai Maine ek mazak mein tweet kiya tha.. mujhe koi shami wami se shaadi nahi karni, mujhe normal lafla chalega lekin loyal wala … aur yeh bhi sun lo I dated Irfan Pathan for 5 years .. phir sab khatam ho Gaya… I won’t trust anybody so easily.. OK..!! https://t.co/jAq3QqqSlq
— Payal Ghoshॐ (@iampayalghosh) December 1, 2023
‘माझ्या मागे गौतम गंभीर आणि अक्षय कुमारही लागले होते’
यानंतर तिने पुढच्या ट्वीटमध्ये लिहिले की, “माझ्या मागे गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) सर्वजण लागले होते, पण मी फक्त इरफान पठाणवर प्रेम करायचे. मला त्याच्याशिवाय कुणीच दिसत नव्हते. मी इरफानला सर्वांबद्दल बोलायचे. सर्वांचे मिसकॉल दाखवायचे. मी फक्त इरफानवर प्रेम केले, इतर कुणावरही नाही.”
Mere pichhhe #gautamgambhir #AkshayKumar sab pade hue the lekin main pyar sırf İrfan Pathan se karti thi, mujhe uske ilaba koi aur dikhta hi nahi tha aur main İrfan ko sab ke ware bolti bhi thi, sab ka miscal dikhati bhi thi… Maine BAs Irfan se pyar kiya aur kisise bhi nahi…
— Payal Ghoshॐ (@iampayalghosh) December 1, 2023
‘गौतम गंभीर मला सारखा मिसकॉल द्यायचा’
अभिनेत्री एवढ्यावरच थांबली नाही. तिने पुढे असेही लिहिले की, “गौतम गंभीर मला सारखा मिसकॉल द्यायचा आणि हे इरफान पठाणला चांगलेच माहिती होते. तो माझा प्रत्येक कॉल तपासायचा. जेव्हा मी त्याला भेटायला पुण्याला गेले होते, तेव्हा त्याने ही गोष्ट युसूफ भाई, हार्दिक-कृणाल पंड्यालाही सांगितली होती. त्यावेळी तिथे बडोदा संघाचा देशांतर्गत सामना सुरू होता.”
Gautam Gambhir mujhe regularly miscall dete the , yeh Irfan ko bohot achhi ta rah pata tha , woh mera sab calls check karta tha .. woh yeh baat mere Samna Yusuf bhai, Hardik Aur Krunal Pandya ko bhi bataya tha jab main irfan ko Pune mein Milne gayi thi.. Domestic match tha…
— Payal Ghoshॐ (@iampayalghosh) December 1, 2023
‘इरफान अजून किती शांत बसणार?’
यानंतर अभिनेत्रीने पुढे लिहिले की, “अरे इरफान कधीतरी माझ्याविषयी बोल, अजून किती शांत बसशील?” यानंतर तिने इरफानसोबतचा तिचा फोटोही शेअर केला आणि लिहिले की, “आमच्या ब्रेकअपनंतर, मी आजारी पडले होते, मी वर्षोनुवर्षे कुठलेही काम करू शकले नाही, पण हे अगदी खरे आहे की, तो एकमेव व्यक्ती आहे, ज्याच्यावर मी मनापासून प्रेम केले आहे.”
Areee @IrfanPathan kab tak muh pe dahi jamake rakhoge… kabhi toh mere kaam aao, https://t.co/F8gVozRp56
— Payal Ghoshॐ (@iampayalghosh) December 1, 2023
After we broke up … I fell ill .. I couldn’t work for years… but he was the only guy whom I loved… after that I never loved anybody ???? pic.twitter.com/vKRYWJl0Ti
— Payal Ghoshॐ (@iampayalghosh) December 1, 2023
अशात आता अभिनेत्रीचे हे ट्वीट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. तसेच, नेटकरी तिच्या या प्रश्नांवर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. आता यावर क्रिकेटपटू प्रतिक्रिया देतात की नाही? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (former cricketer irfan pathan gambhir karte the miss calls revelation of payal ghosh who proposed mohammed shami)
हेही वाचा-
‘त्याला लॉलीपॉप दिलंय…’, चहलला टी20 ऐवजी वनडे संघात जागा मिळताच दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया
दिल्लीने दिला होता डिविलियर्सला धोका? 13 वर्षे जुना किस्सा सांगत ‘मिस्टर 360’ म्हणाला, ‘त्यांनी मला…’