सध्या सोशल मीडियाचा वापर करत नाही असे क्वचितच लोक भेटतील. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत, राजकारण्यांपासून ते क्रिकेटपटूंपर्यंत सर्वजण सोशल मीडियावर जबरदस्त सक्रिय असतात. यामध्ये भारतीय संघाचा माजी अष्टपैलू इरफान पठाण याचाही समावेश आहे. इरफानचा सोशल मीडियावर मोठा वावर आहे. त्याला इंस्टाग्रामवर 3.7 मिलियन लोक फॉलो करतात. तो त्याच्या चाहत्यांसाठी नेहमी काही ना काही पोस्ट करत असतो. खरं तर, तो झिम्बाब्वेच्या जिम-एफ्रो टी10 लीगमद्ये खेळताना दिसणार आहे. त्यासाठी तो हरारे येथे पोहोचला आहे. यादरम्यान त्याने विमानतळावरील व्हिडिओ शेअर केला आहे.
इरफानचा व्हिडिओ व्हायरल
इरफान पठाण (Irfan Pathan) याने शेअर केलेल्या या व्हिडिओत तो युसूफ पठाण (Yusuf Pathan) याचा मुलगा अयान पठाण (Ayaan Pathan) याच्याकडून डान्स मूव्हज शिकताना दिसला. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.
खरं तर, मंगळवारी (दि. 18 जुलै) 38 वर्षीय अष्टपैलू इरफानने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत इरफानने त्याचा पुतण्या अयान पठाण याच्यासोबत विमानतळावर डान्स मूव्हज शिकताना दिसत आहे. अयान त्याच्या काकाला वेगवेगळे डान्स स्टेप्स शिकवत आहे, जे इरफानने चांगल्याप्रकारे करूनही दाखवत आहेत.
हा व्हिडिओ शेअर करत इरफानने खास कॅप्शनही दिले आहे. त्याने लिहिले आहे की, “अयान मला त्याचे काही मूव्हज शिकवत आहे.”
https://www.instagram.com/reel/Cu2CkJhoMbc/
इरफानचा हा व्हिडिओ आतापर्यंत 3 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तसेच, 44 हजारपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडिओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे, तर शेकडो कमेंट्सचा पाऊसही पाडला आहे. एकाने कमेंट करत लिहिले की, “काका पुतण्याची मस्त मज्जा.” दुसऱ्या एकाने कमेंट केली की, “हीच नवी पिढी आहे, जी आपल्याला शिकवत आहे.”
स्पर्धेविषयी थोडक्यात
झिम्बाब्वेच्या टी10 लीगविषयी बोलायचं झालं, तर या लीगची सुरुवात गुरुवारपासून (दि. 20 जुलै) हरारे येथे होणार आहे. पहिल्या सामन्यात हरारे हरिकेन्स विरुद्ध बुलावायो ब्रेव्ह्स संघ आमने-सामने असणार आहेत. या स्पर्धेचा अंतिम सामना 29 जुलै रोजी खेळला जाईल. यादरम्यान स्पर्धेत एकूण 24 सामने खेळले जातील. तसेच, 5 संघ या स्पर्धेत उतरणार आहेत.
इरफानव्यतिरिक्त 5 भारतीयांचा समावेश
इरफान पठाण यांच्याव्यतिरिक्त 5 भारतीय या स्पर्धेत खेळताना दिसतील. त्यात पार्थिव पटेल, एस श्रीसंत, युसूफ पठाण, रॉबिन उथप्पा आणि अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नी यांच्या नावाचा समावेश आहे. स्पर्धेतच्या पहिल्या हंगामात इरफान हरारे हरिकेन्स संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
इरफानविषयी बोलायचं झालं, तर तो अखेरचा लीजेंड्स क्रिकेट ट्रॉफीमध्ये खेळताना दिसला होता. त्यात चंदीगड चॅम्प्स संघाचा भाग होता. (former cricketer irfan pathan learning dance moves from his nephew at the airport see video here)
महत्त्वाच्या बातम्या-
लय भारी! वेगाने धावा काढणाऱ्या मार्शचा बेअरस्टोने ‘असा’ काढला काटा, अविश्वसनीय कॅच तुम्हीही पाहाच
आता विरोधकांची खैर नाही! अखेर एक वर्षानंतर फिट होऊन संघात परतला ‘हा’ पठ्ठ्या, कर्णधाराचं टेन्शनही दूर