---Advertisement---

‘…तर जागा मिळालीच नसती’, WTC फायनलमध्ये रहाणेची निवड होताच इरफान पठाणचे खळबळजनक भाष्य

Ajinkya-Rahane
---Advertisement---

अजिंक्य रहाणे आपल्या कसोटी क्रिकेटमधील अनुभवाच्या जोरावर आयपीएल 2023 स्पर्धेत तंत्रशुद्ध फटकेबाजी करत आहे. तो या स्पर्धेत धावांचा पाऊस पाडत असतानाच त्याच्यासाठी आनंदाची बातमी आली. मंगळवारी (दि. 25 एप्रिल) बीसीसीआयने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या अंतिम सामन्यासाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. यात रहाणेचेही नाव सामील आहे. रहाणेचे तब्बल 1 वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. त्याने शेवटचा कसोटी सामना जानेवारी 2022मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. अशात त्याच्या पुनरागमनावर भारताच्या माजी दिग्गजांनी वक्तव्य करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये इरफान पठाण याचाही समावेश आहे. त्याने रहाणेच्या पुनरागमनावर खळबळजनक मत मांडले आहे.

इरफान पठाण (Irfan Pathan) म्हणाला आहे की, जर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) फिट असता, तर कदाचित अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याला जागा मिळाली नसती. त्यामुळे आता इरफानचे वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे.

आपले मत मांडताना इरफान म्हणाला की, “जर श्रेयस अय्यर फिट असता, तर रहाणेला डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात जागा मिळाली नसती. मात्र, जोपर्यंत त्याच्या चालू फॉर्मची बाब आहे, तो शानदार लयीत दिसत आहे. तो ज्या क्रिकेट प्रकारात खेळत आहे, ते पूर्ण वेगळे आहे. मात्र, रहाणेचे परदेशातील खेळपट्ट्यांवरील कामगिरी नेहमीच चांगली राहिली आहे आणि त्यामुळे हे त्याच्या पारड्यात पडलं आहे.”

दुसरीकडे, हरभजन सिंग यानेही सूर्यकुमार यादव याला संघात न निवडल्यामुळे नाराजी व्यक्त केली. सूर्याबद्दल तो म्हणाला की, “डब्ल्यूटीसी संघात सूर्यकुमारला जागा मिळायला हवी होती.” तो म्हणाला की, “रहाणेसोबत सूर्यकुमार यादवलाही संघात घेतले पाहिजे होते. कारण, सूर्यकुमार डाव वेगाने पुढे नेऊ शकतो. मी सूर्या आणि रहाणे दोघांना संघात ठेवले असते. मी अक्षरच्या जागी सूर्याला खेळवले असते. कारण, तुम्ही इंग्लंडच्या परिस्थितीमध्ये तीन फिरकीपटूंसोबत खेळणार नाहीयेत. अशात सूर्या संघात असल्यामुळे तुम्हाला अतिरिक्त फलंदाज मिळतो, जो संघासाठी फायदेशीर ठरू शकत होता.” (former cricketer irfan pathan on ajinkya rahanes inclusion indias wtc final squad read more)

https://twitter.com/ICC/status/1650817006285758466

डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भारत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रहाणेच्या कसोटी कमबॅकवर आली सर्वात मोठी प्रतिक्रिया, माजी निवडकर्ता आनंदी; म्हणाला, ‘याचे श्रेय…’
‘गुरू नेहराजींचे ज्ञान आले कामी’, मुंबईला पराभवाची धूळ चारल्यानंतर कॅप्टन पंड्याचे मोठे वक्तव्य

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---