Irfan Pathan on Hardik Pandya: इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांमध्ये गणला जाणारा संघ म्हणजे मुंबई इंडियन्स होय. 5 किताब जिंकणाऱ्या मुंबईने आयपीएल 2024 हंगामापूर्वी घेतलेल्या निर्णयांची चांगली चर्चा रंगली आहे. मुंबईने सर्वांना हैराण करत रोहित शर्मा याच्या जागी हार्दिक पंड्या याला कर्णधार बनवले. त्यानंतर खासकरून मुंबईचे चाहते नाराज झाले आहेत. अनेकांना वाटते की, मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाने चुकीचा निर्णय घेतला आहे. मुंबईला 5 किताब जिंकून देणाऱ्या रोहितला हटवून अचानक पंड्याला कर्णधार बनवणे, चाहत्यांना पचले नाहीये. अशात भारतीय संघाचा माजी अष्टपैलू इरफान पठाण याने या मुद्द्यावर मोठी प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाला इरफान पठाण?
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना इरफान पठाण (Irfan Pathan) याने हार्दिक पंड्या (Hardik Pandya), रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्याविषयी परखड मत मांडले. इरफान म्हणाला, “रोहित शर्माचा मुंबई इंडियन्समध्ये जो मान आहे, तो अगदी तसाच आहे, जसा एमएस धोनीचा चेन्नई सुपर किंग्समध्ये आहे. रोहितने मुंबईला कर्णधार म्हणून बनवले आहे. संघाला उभे करण्यात रोहितने खूप मेहनत घेतली आहे. संघाच्या बैठकीत जातो आणि आपले मत मांडतो, रणनीती बनवतो.”
“मी रोहितला गोलंदाजांचा कर्णधार मानतो. तो वर्षोनुवर्षे संघाला पुढे घेऊन आला आहे. मागील वर्षी जो संघ होता, किती लोकांना वाटले असेल की, हा संघ क्वालिफाय करेल. कर्णधार म्हणून रोहितने संघाला क्वालिफाय करून दिले. मुंबईची जी गोलंदाजी होती, ती सामान्य होती. जोफ्रा आर्चर खेळत नव्हता, बुमराहही संघात नव्हता. तरीही रोहितने संघाला क्वालिफाय करून दिले,” असेही इरफान म्हणाला.
याव्यतिरिक्त इरफानने हार्दिक पंड्यासमोर काय-काय आव्हाने असतील, हेही सांगितले. त्याने म्हटले की, “आता जो निर्णय घेतला गेला आहे. मला वाटते की, मुंबई इंडियन्सकडे सूर्यकुमार यादव उपस्थित होता. बुमराहही संघात होता. आता इथून हार्दिक पंड्यासाठी सर्वात मोठे आव्हान हे असेल की, या सर्वांसोबत, रोहितसोबत, सूर्यासोबत, बुमराहसोबत, जे स्वत:च एक लीडर आहेत. बुमराहनेही नेतृत्व केले आहे. कर्णधार म्हणून हार्दिकपुढे सर्वात मोठे आव्हान या सर्वांना एकत्र घेऊन जाणे असेल. आता जे काही निकाल आयपीएलमध्ये येतील, ते संघ व्यवस्थापनातच आहेत. मी सांगत आहे की, हार्दिकसाठी मुंबईचे नेतृत्व करणे सोपे नसेल.”
खरं तर, आयपीएल 2024 हंगामाला सुरुवात व्हायला अजून काही महिने आहेत. त्यापूर्वी या हंगामाचा लिलाव पार पडणार आहे. हा लिलाव मंगळवारी, 19 डिसेंबर रोजी दुबईच्या कोका-कोला एरेनामध्ये पार पडणार आहे. या लिलावाची सर्व क्रिकेटप्रेमींना आतुरता लागली आहे. (former cricketer irfan pathan on rohit sharma vs hardik pandya mumbai indians ipl auction 2024 )
हेही वाचा-
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकरही बनले विराटचे चाहते; म्हणाले, ‘बंगळुरूमध्ये जेव्हा मी त्याला…’
हार्दिक पंड्याची पत्नी नताशा चाहत्यांच्या निशाण्यावर, पोस्टवर अश्लिल कमेंट करत केले ट्रोल