चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने १० जून रोजी श्रीलंका दौऱ्यासाठी २० सदस्यीय भारतीय संघाची निवड केली आहे. या संघात युवा प्रतिभाशाली शिलेदारांना संधी देण्यात आली आहे. युवा खेळाडूंची भरमार असलेल्या या संघाचे नेतृत्त्वपद अनुभवी फलंदाज शिखर धवन याच्याकडे सोपवण्यात आले आहे. धवनला भलेही संघाचे नेतृत्त्व करण्याचा अनुभव नाही. परंतु तो दोन वेळा भारतीय संघाचा उपकर्णधार राहिला आहे. मात्र माजी भारतीय गोलंदाज डोड्डा गणेश हे धवनला संघनायक बनवण्याच्या निर्णयावर नाखुश आहेत.
धवनऐवजी ३१ वर्षीय मनिष पांडेला भारतीय संघाचा कर्णधार नियुक्त करायला हवे होते, असे त्यांचे म्हणणे आहे. एवढेच नव्हे तर, फिरकीपटू भुवनेश्वर कुमारला संघाचा उपकर्णधार बनवल्यानेही ते असमाधानी आहेत.
स्पोर्ट्सकीडाशी बोलताना डोड्डा गणेश म्हणाले की, “जर श्रीलंका दौऱ्यावर अनुभवी खेळाडूलाच कर्णधार करणे प्राधान्याचे होते; तर धवनला नव्हे तर मनिषला भारतीय संघाचा कर्णधार बनवायला पाहिजे होते. मनिष बऱ्याचशा खेळाडूंना पुर्णपणे ओळखतो. त्याने बराचसा प्रवासही केला आहे. जर धवनला इंग्लंड दौऱ्यावरील राखीव खेळाडूंमध्ये निवडले गेले असते; तर तुम्ही कोणावर नेतृत्तवपदाची जबाबदारी सोपवली असती? हेच नव्हे तर, भुवनेश्वर उपकर्णधार बनण्यास खरंच पात्र होता का?”
डोड्डा यांच्या वक्तव्याला पाहता, धवनची इंग्लंड दौऱ्यावरील भारीय संघात निवड होणे जवळपास अशक्य होते. कारण २०१८ पासून तो भारतीय कसोटी संघातून बाहेर आहे. तसेच भुवनेश्वरही मनिषपेक्षा जास्त अनुभवी खेळाडू आहे. वनडेत १ शतकाची नोंद असलेल्या मनिषने २०१५ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते. तर भुवनेश्वर त्याच्या ३ वर्षांपुर्वी अर्थात २०१२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे.
असा आहे श्रीलंका दौऱ्याचा कार्यक्रम
भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर केवळ मर्यादित षटकांच्या मालिका खेळणार आहे. १३ जुलै रोजी वनडे सामन्याने या मालिकेचा शुभारंभ होणार आहे. १८ जुलै रोजी वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळला जाईल. त्यानंतर २१ ते २५ जुलै या कालावधीत ३ सामन्यांची टी२० मालिका होणार आहे. हे सर्व सामने कोलंबो येथे पार पडणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘नेट गोलंदाज म्हणून श्रीलंकेला गेल्यास आनंदी असतो,’ चेतन सकारियाचे लक्षवेधी वक्तव्य
विक्रमात सचिनच्या पुढे होता ‘हा’ खेळाडू, परंतु चर्चा व्हायची ड्रग्ज घेण्याची
ऋतुराजला कशी मिळाली भारतीय संघात निवड झाल्याची बातमी? किस्सा आहे अतिशय रोमांचक