भारतीय क्रिकेट संघाला 1983 साली पहिले वहिले वनडे विश्वचषक जिंकून देणारे कर्णधार म्हणजे कपिल देव होय. कपिल देव यांची गणना जगातील दिग्गज खेळाडूंमध्ये होते. ते त्यांच्या रोखठोक स्वभावासाठीही ओळखले जातात. आताही त्यांनी एक रोखठोक वक्तव्य केले आहे. त्यांनी सध्याच्या काळातील खेळाडूंच्या वर्कलोड व्यवस्थापनावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. कपिल देव यांनी एका कार्यक्रमात म्हटले की, जे खेळाडू वर्कलोडच्या दबावाचे कारण सांगत आहेत, त्यांच्यात क्रिकेटविषयी प्रेम नाहीये.
कपिल देव (Kapil Dev) यांनी त्यांच्या या वक्तव्यातून त्या खेळाडूंवर निशाणा साधला आहे, जे सातत्याने क्रिकेटमुळे विश्रांतीवर जातात आणि मोठ्या स्पर्धेपूर्वी फिटनेस गमावतात. मात्र, यादरम्यान त्यांनी कोणत्याही खेळाडूचे नाव घेतले नाही. मात्र, त्यांनी इशाऱ्यामध्ये सांगितले की, ते कोणाबद्दल बोलत आहेत.
मागील काही वर्षांपासून सातत्याने क्रिकेट खेळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वर्कलोड व्यवस्थापनामुळे खेळाडूंना मालिकेचे महत्त्व आणि क्रिकेट प्रकारानुसार विश्रांती दिली जाते, ज्यामुळे त्यांच्यावर जास्त दबाव येणार नाही. मात्र, काही खेळाडू तीन क्रिकेट प्रकारात खेळतात. अशात, त्यांच्यासमोर सर्वात मोठे आव्हान असते, ते म्हणजे फिटनेस व्यवस्थित राखणे.
काय म्हणाले कपिल देव?
खेळाडूंवरील दबावाबद्दल बोलताना कपिल देव म्हणाले की, “मला खेळण्याचे वेड होते. हेच अंतर आहे. मी विषय थोडा बदलू इच्छितो. मी सध्या टीव्हीवर बरंच काही ऐकतो. लोक म्हणतात की, ‘दबाव आहे, आम्ही आयपीएल खेळतो, खूप दबाव आहे.’ मी त्यांना फक्त एकच सांगतो की, खेळू नका. हा दबाव म्हणजे काय आहे? जर तुमचे क्रिकेटवर प्रेम असेल, तर दबाव नसायलाच पाहिजे.”
Nailed it 👏🏽👏🏽 @therealkapildev pic.twitter.com/Wbs86nyEQh
— Aces Middle East (@Aces_sports) October 8, 2022
पुढे बोलताना कपिल देव म्हणाले की, “प्रेशर, डिप्रेशन हे अमेरिकन शब्द आहेत. दबाव असो किंवा नैराश्य. मला समजत नाही की, मी एक शेतकरी आहे. मी तेथून आलो आहे. आम्ही मजेसाठी खेळलो आणि जिथे आनंद आहे, तिथे दबाव असू शकत नाही.”
नाव न घेता बुमराहवर साधला निशाणा
भारतीय क्रिकेट संघ टी20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला. मात्र, जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्या पर्याय अजूनही समोर आला नाहीये. मात्र, आता जवळपास हे नक्की झाले आहे की, बुमराहच्या जागी टी20 विश्वचषकात मोहम्मद शमी याला सामील केले जाईल. मात्र, याबद्दल अद्याप औपचारिक घोषणा करण्यात आली नाहीये.
भारतात खेळण्यात आलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत बुमराहला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेतून बाहेर पडावे लागले होते. आता तो टी20 विश्वचषकातूनही बाहेर पडला आहे. भारतासाठी हा मोठा धक्का आहे. बुमराहने अखेरच्या षटकात संघाला अनेक विजय मिळवून दिले आहेत, पण आता त्याच्या अनुपस्थितीत संघाच्या चिंतेत वाढ झाली आहे.
बुमराह दुखापतग्रस्त झाल्यानंतर आता असे प्रश्न उपस्थित होत आहेत की, हा तोच खेळाडू आहे, जो आयपीएलमध्ये न थांबता आपल्या संघासाठी पूर्ण हंगामात खेळताना दिसतो. मात्र, आता जेव्हा राष्ट्रीय कर्तव्य समोर उभे ठाकले आहे, तेव्हा थकवा आणि दबावाचे संदर्भ देत विश्रांती घेतात. तसेच, आपली फिटनेसही गमावून बसतात.
टी20 विश्वचषकाबद्दल बोलायचं झालं, तर ही मोठी स्पर्धा येत्या 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियामध्ये खेळली जाणार आहे. यातील भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध 23 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
याचं करायचं काय? सराव सामन्यातही सपशेल अपयशी ठरला रिषभ; 17 चेंडू खेळून पण…
ना इंग्लंड, ना ऑस्ट्रेलिया; आयसीसीच्या मते भारत अन् पाकिस्तानचे ‘हे’ दोन खेळाडूच सर्वात भारी