भारत देशात क्रिकेट हा फक्त एक खेळ नाही, तर कदाचित 140 कोटी भारतीयांसाठी धर्मच आहे. संघाने एक सामना जरी गमावला, तरी चाहते ढसाढसा रडू लागतात. भारतात क्रिकेटला जितका, मान-सन्मान दिला जातो, कदाचित तितका इतर खेळांना क्वचितच मिळत असेल. यावर्षी भारतात वनडे विश्वचषकाचे आयोजन होणार आहे. हा विश्वचषक जिंकून भारतीय संघ मागील 10 वर्षांचा आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करेल. त्यापूर्वी आपण भारतीय संघाचे दिग्गज अष्टपैलू कपिल देव यांच्या एका कामगिरीविषयी जाणून घेऊयात…
कपिल देव (Kapil Dev) यांनी आजच्याच दिवशी (18 जून) 40 वर्षांपूर्वी 1983मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. अशी कामगिरी त्यावेळी करणे तर दूरच, त्याचा विचार करणेही जवळपास अशक्यच होते. मात्र, कपिल पाजींनी तो मैलाचा दगड पार केला होता. त्यांची ही कामगिरी पाहून आजदेखील प्रत्येक भारतीयाची मान उंचावते.
सन 1983मधील यादगार सामना
सन 1983 विश्वचषक (1983 World Cup) स्पर्धेत कपिल देव यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने किताब जिंकून जगाला दाखवून दिले होते की, आम्हीही कुणापेक्षा कमी नाहीत. मात्र, आपण भारत विरुद्ध झिम्बाब्वे (India vs Zimbabwe) संघात आजच्याच दिवशी पार पडलेल्या सामन्यातील कपिल पाजींच्या खेळीविषयी जाणून घेऊयात. या सामन्यात भारताच्या विजयाच्या आशा खूपच कमी दिसत होता. मात्र, कपिल पाजींनी वादळी फलंदाजी करत ऐतिहासिक खेळी साकारली, जी आजही क्रिकेट इतिहासाच्या पुस्तकात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली आहे. या खेळीच्या जोरावर भारताने झिम्बाब्वेला पराभवाची धूळ चारली होती.
कपिल पाजींची ऐतिहासिक खेळी
भारत विरुद्ध झिम्बाब्वे संघात विश्वचषकाचा 20वा सामना खेळला जात होता. त्यावेळी क्रिकेट 60 षटकांचे खेळले जायचे. इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकाचा हा सामना त्यावेळी टूनब्रिज मैदानावर खेळला जात होता. सामन्यात कर्णधार कपिल देव यांनी नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताने 17 धावांवर 5 विकेट्स गमावल्या होत्या. सुनील गावसकर (0), के श्रीकांत (0), मोहिंदर अमरनाथ (5), संदीप पाटील (1) आणि यशपाल शर्मा (9) यांसारखे दिग्गज तंबूत परतले होते. संघाची स्थिती पाहून असे वाटत होते की, भारत सामना गमावतोय. मात्र, कपिल देव यांची फलंदाजी अजूनही बाकी होती. कुणीच विचार केला नव्हता की, कपिल पाजींची ही खेळी दशके लक्षात ठेवली जाईल. कपिल पाजींनी कर्णधाराला साजेशी खेळी करत 138 चेंडूत नाबाद 175 धावा चोपल्या. या खेळीत 16 चौकार आणि 6 षटकारांची बरसात झाली होती. कपिल देव यांनी संघाला कठीण स्थितीतून काढत 266 अशी समाधानकारक धावसंख्याही उभारली होती.
भारताने उंचावला विश्वचषक
भारतीय संघाच्या 267 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वे संघाचा डाव 235 धावांवर संपुष्टात आला होता. हा सामना भारताने 31 धावांनी जिंकला होता. भारताने 1983मध्येच कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली पहिला-वहिला विश्वचषक जिंकला होता. कपिल देव यांच्याव्यतिरिक्त याव्यतिरिक्त एमएस धोनी (MS Dhoni) हा असा कर्णधार होता, ज्याने भारताला विश्वचषक जिंकून दिला. धोनीने 2007मध्ये टी20 विश्वचषक आणि 28 वर्षांनंतर 2011मध्ये वनडे विश्वचषक जिंकून दिला होता. 2011नंतर भारतीय संघाने वनडे विश्वचषक जिंकला नाहीये. अशात चाहत्यांना आशा आहे की, वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या वनडे विश्वचषकात विजय मिळवून आणखी भारतीय संघ एक ट्रॉफी आपल्या नावावर करेल. (former cricketer kapil dev smashed 175 not out runs against zimbabwe in 1983 world cup on 18 june ind vs zim world cup)
महत्वाच्या बातम्या-
वेस्ट इंडिज दौऱ्यावर भारतीय संघात होणार मोठा बदल? रोहितच्या जागी ‘हा’ पठ्ठ्या बनू शकतो कर्णधार
रणजीत 7 सामन्यात 50 विकेट्स, तरीही दुलीप ट्रॉफीत मिळाली नाही संंधी; गोलंदाज म्हणाला, ‘भारतात…’