---Advertisement---

‘तो पण 360 डिग्री खेळाडू…’, वेंकटेशने वादळी शतक ठोकताच इंग्लंडच्या माजी दिग्गजाचे मोठे विधान

On: सोमवार, एप्रिल 17, 2023 6:01 PM
Venkatesh-Iyer
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील पहिल्या पाच सामन्यांनंतर सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वलस्थानी भारतीय खेळाडू झळकतोय. तो खेळाडू इतर कुणी नसून कोलकाता नाईट रायडर्स संघाचा विस्फोटक फलंदाज वेंकटेश अय्यर आहे. अय्यरची वादळी फलंदाजी पाहून इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन याने मोठे भाष्य केले आहे. त्याने या युवा भारतीय फलंदाजाची प्रशंसा केली आहे. वेंकटेशने मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध अवघ्या 49 चेंडूत वादळी शतक झळकावले. यानंतर पीटरसनने त्याला 360 डिग्री खेळाडू म्हटले आहे.

काय म्हणाला पीटरसन?
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना केविन पीटरसन (Kevin Pietersen) म्हणाला की, “वेंकटेश अय्यर उंच खेळाडू आहे. त्यामुळे त्याचा फायदा त्याला मिळतो. बॅकफुटवर त्याने ज्याप्रकारे खेळ दाखवला आहे, त्याने मी खूपच प्रभावित झालो आहे. तो फिरकीपटूंविरुद्धही चांगला खेळतो. तो 360 डिग्री खेळाडू आहे.”

‘सामनावीर’ वेंकटेश अय्यर
सामन्यात वेंकटेश अय्यर दुसऱ्या षटकातच फलंदाजीला आला होता. त्याने येताक्षणीच आक्रमक फलंदाजी करत मोठमोठे फटके मारण्यास सुरुवात केली. तो यादरम्यान दुखापतग्रस्तही झाला, पण तो खेळतच राहिला. त्याने 23 चेंडूत पहिले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर 49 चेंडूत आयपीएल कारकीर्दीतील पहिले आणि कोलकाताच्या इतिहासातील दुसरे शतक ठोकले. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

सामन्याचा आढावा
सामन्याबाबत बोलायचं झालं, तर आयपीएल 2023च्या 22व्या सामन्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाला 5 विकेट्सने पराभूत केले. कोलकाताने हा सामना गमावला असला, तरीही वेंकटेश अय्यर याने त्याच्या शतकी खेळीमुळे सर्वांची मने जिंकली. तो तिसऱ्या स्थानी फलंदाजीला आला होता. त्याने यादरम्यान वादळी फलंदाजी करत कोलकाताला 20 षटकात 185 धावा करण्यात मदत केली. मुंबईने 186 धावांचे आव्हान 5 विकेट्स शिल्लक ठेवत पूर्ण केले.

वेंकटेशने मारले 9 षटकार
वेंकटेश अय्यर याने सामन्यात 51 चेंडूत 104 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 6 चौकार आणि 9 षटकारांचा पाऊस पाडला. या शतकासह तो कोलकातासाठी 15 वर्षांनंतर शतक ठोकणारा दुसरा खेळाडू बनला. त्याच्यापूर्वी ब्रेंडन मॅक्युलम याने पहिल्याच हंगामाच्या पहिल्याच सामन्यात शतक झळकावले होते. मॅक्युलमने त्यावेळी 158 धावांची वादळी खेळी साकारली होती. (former cricketer kevin-pietersen say venkatesh iyer is also a 360 degree player ipl 2023 )

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘माझं नाव सिमरन…’, विजयानंतर ड्रेसिंग रूममध्येही चमकला हेटमायर; मजा-मस्तीचा व्हिडिओ तुफान व्हायरल
गांगुली-विराट नाराजीचा ड्रामा वाढला, आता कोहलीने उचलले टोकाचे पाऊल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---