---Advertisement---

मोदी टॅायलेटमध्ये अभिनंदन स्विकारतील का? ड्रेसिंगरुममधील व्हिडीओनंतर पाहा कोणी केलीय टीका

---Advertisement---

वनडे विश्वचषक 2023 वनडे विश्वचषक अंतिम सामना रविवारी (19 नोव्हेंबर) खेळला गेला. यजमान भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा गडी राखून पराभव केला. भारतीय संघ या प्रभावामुळे निराश झालेला असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सामन्यानंतर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचले.  त्यांनी भारतीय संघाच्या खेळाडूंचा उत्साह वाढवला. मात्र, या प्रकरणावर आता माजी भारतीय क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांनी टीका केली आहे.

अंतिम सामन्यात भारतीय संघ फारसा प्रतिकार करू शकला नाही व त्यांना एकतर्फी पराभव पत्करावा लागला. या सामन्याला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली होती. सामना समाप्त झाल्यानंतर निराश असलेल्या भारतीय संघाची त्यांनी भेट घेतली. त्यांनी सर्व खेळाडूंना मान उंच ठेवण्याचा सल्ला दिला. यानंतर आझाद यांनी ट्विट करत लिहिले,

‘ड्रेसिंग रूम प्रत्येक संघासाठी एखाद्या मंदिरासारखे असते. आयसीसी खेळाडू व सपोर्ट स्टाफ व्यतिरिक्त कोणालाही तेथे येण्याची परवानगी देत नाही. पंतप्रधानांनी खेळाडूंना बाहेरच्या भेट कक्षात भेटायला हवे होते. पंतप्रधान मोदी यांची भेट घेण्यासाठी आलेल्या लोकांना बेडरूम, ड्रेसिंग रूम किंवा टॉयलेटमध्ये भेटतील का?’

त्यांनी पुढे लिहिले, ‘खेळाडू हे राजकारण्यांपेक्षा अधिक शिस्तप्रिय असतात. शेवटचं म्हणजे 1983 मध्ये विश्वचषक जिंकलेल्या कर्णधार व खेळाडूंना आमंत्रित करण्यात आले नव्हते. हे राजकारण कोण करत आहे?’

आझाद यांच्या व्यतिरिक्त देखील अनेकही राजकीय नेत्यांनी मोदी यांच्या या कृतीवर टीका केली आहे.

(Former Cricketer Kirti Azad Angry On PM Narendra Modi Meet Team India In Dressing Room)

महत्वाच्या बातम्या –  
BREAKING: लखनऊला बाय-बाय करत गंभीर पुन्हा केकेआरच्या ताफ्यात, आगामी IPL साठी बनला मेंटर

“एक लाख 30 हजार लोक शांत झाले आणि…” लॅब्युशेनने सांगितला Final मधील ‘तो’ क्षण 

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---