क्रिकेटविश्वात असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे, पण आजही त्यांची क्रेझ कायम आहे. त्यापैकीच एक म्हणजे भारतीय संघाचा माजी दिग्गज कर्णधार एमएस धोनी होय. धोनीने 2020मध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवत्ती घेतली होती. मात्र, त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. धोनी नेहमी चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतो. अशात सध्या सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत रांचीच्या रस्त्यांवर एमएस धोनी रोल्स रॉयस ही आलिशान कार चालवताना दिसत आहे.
रोल्स रॉयस चालवताना दिसला धोनी
खरं तर, इंस्टाग्राम स्टोरीवर एमएस धोनी (MS Dhoni) याच्या एका चाहत्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत माजी भारतीय कर्णधार एमएस धोनी रोल्स रॉयस (MS Dhoni Rolls Royce) कार कचालवताना दिसत आहे. यावेळी कार चालवताना ‘माही’ (Mahi) आपल्याच धुंदीत दिसत असून त्याचे संपूर्ण लक्ष कार चालवण्यावर आहे. धोनीच्या विंटेज रोल्स रॉयस (Vintage Rolls Royce) कारचा रंग निळा असल्याचे दिसत आहे.
https://www.instagram.com/reel/CvHTnFeJxpu/?utm_source=ig_embed&ig_rid=33a5a332-dd43-4cf7-bc7f-25f4c35afa4a
बाईक्सचा चाहता आहे धोनी
एमएस धोनी याला बाईक्स आणि कार चालवण्याची प्रचंड आवड आहे. नुकतेच, भारतीय संघाचा माजी खेळाडू वेंकटेश प्रसाद याने धोनीच्या बाईक आणि कार कलेक्शनचा एक व्हिडिओ ट्विटर अकाऊंटवर शेअर केला होता. यावेळी धोनीचे प्रचंड मोठे बाईक आणि कार कलेक्शन पाहून वेंकटेश प्रसादही हैराण झाला होता. त्याने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले होते की, “हे कोणत्याही शोरूमपेक्षा कमी नाहीये.”
खरं तर, धोनीकडे जगातील सर्वात महागड्या बाईक्स आणि कार आहेत. धोनी जेव्हाही घरी असतो, तेव्हा तो नेहमी आपल्या आवडीच्या बाईक्स आणि कारमधून फेरफटका मारताना दिसतो.
गुडघ्याच्या सर्जरीतून सावरतोय ‘माही’
आयपीएल 2023 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स संघाला चॅम्पियन बनवल्यानंतर धोनीने मुंबईत आपल्या गुडघ्याची सर्जरी केली होती. सध्या धोनी त्याच्या घरीच विश्रांती करत आहे. यानंतर धोनी त्याचे रिहॅब पूर्ण करेल. धोनीने अखेरच्या आयपीएल हंगामात स्पष्ट केले होते की, तो आयपीएल 2024मध्ये खेळताना दिसेल. तो म्हणाला होता की, त्याने हा निर्णय चाहत्यांसाठी घेतला आहे. (former cricketer ms dhoni driving vintage rolls royce car in ranchi see video)
महत्त्वाच्या बातम्या-
विरोधी संघांनो सावधान! वनडे विश्वचषकात खेळण्यासाठी इंग्लंडचा जबरदस्त खेळाडू फिट, लगेच वाचा
वेस्ट इंडिज मालिका एवढी महत्त्वाची आहे तरी का? कॅप्टन रोहितने सांगितलं मोठं कारण