---Advertisement---

भारतीय कर्णधाराविषयी मुरलीधरनचा मोठा दावा! म्हणाला, ‘रोहित शर्मा पुढचा विश्वचषक…’

Rohit-Sharma
---Advertisement---

जगातील सर्वात यशस्वी गोलंदाजांमधील आघाडीचे नाव श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन याचे आहे. मुरलीधरनने त्याच्या कारकीर्दीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स (1347) घेण्याचा पराक्रम गाजवला आहे. अशात मुरलीधरनने भारताचा 36 वर्षीय कर्णधार रोहित शर्मा याच्याविषयी मोठे विधान केले आहे. त्याने रोहित शर्मा विश्वचषक 2027 स्पर्धेत खेळणार की नाही, याविषयी भाष्य केले आहे.

मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) याने सांगितले की, भारतीय कर्णधार रोहित शर्मा विश्वचषक 2027 (Rohit Sharma World Cup 2027) स्पर्धेत कसा खेळू शकतो. त्याच्या मते, रोहित शर्मा (Rohit Sharma) याने त्याची फिटनेस विराट कोहली (Virat Kohli) याच्याप्रमाणे चांगला केला, तर तो सहजरीत्या पुढील विश्वचषक 2027 (World Cup 2027) स्पर्धेत खेळू शकतो. पुढील विश्वचषकापर्यंत रोहितचे वय 40, तर विराटचे वय 39 होईल. रोहितने कधीच विश्वचषक विजेत्या संघाचा भाग बनला नाहीये.

काय म्हणाला मुरलीधरन?
रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघाला विश्वचषक 2023 स्पर्धेत ट्रॉफी उंचावण्याची सुवर्णसंधी होती, पण सलग 10 सामने जिंकून अंतिम सामना गाठणाऱ्या भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून 6 विकेट्सने पराभूत व्हावे लागले. तसेच, रोहित शर्माचे देशासाठी वनडे विश्वचषक जिंकून देण्याचे स्वप्नही तुटले. आता पुढील विश्वचषकासाठी 4 वर्षांचा काळ आहे. मात्र, चाहत्यांची इच्छा आहे की, रोहितने पुढील विश्वचषकही खेळावा, पण यामध्ये समस्या आहेत.

रोहितच्या विश्वचषकातील कामगिरीने मुरलीधरन खूपच खुश आहे. तो जिओ सिनेमावर बोलताना म्हणाला की, “तुम्ही त्याचे विश्वचषकातील प्रदर्शन पाहा. त्याने जी सुरुवात दिली, ज्याप्रकारच्या स्ट्राईक रेटने त्याने फलंदाजी केली, तो स्पर्धेत कधीही अयशस्वी झाला नाही. तो 36 वर्षांचा युवा आहे. जर त्याने विराटसारखे आपल्या फिटनेसवर लक्ष दिले, तर तो आणखी एक विश्वचषक खेळू शकतो.”

मुरलीधरनने रोहितच्या टी20 क्रिकेटमध्ये खेळण्यालाही पाठिंबा दिला. तो म्हणाला की, वनडे विश्वचषकातील त्याचा स्ट्राईक रेट टी20साठीही चांगला होता. तसेच, त्याला 2024मधील पुढील टी20 विश्वचषक खेळायचा आहे. यावरून तो निश्चितच खेळेल. दिग्गज म्हणाला, “लोक इतक्या कठोर चर्चा का करत आहेत की, ही त्याच्या जाण्याची आणि युवा खेळाडूंना आणण्याची योग्य वेळ आहे. जोपर्यंत तो फिट होऊन प्रदर्शन करत आहे, त्याला खेळू द्या. रोहितने वनडेत 130च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली, जी टी20साठी वाईट नाहीये. तो एक अनुभवी खेळाडू आहे. तुम्हाला फक्त 35 वयानंतर तुमच्या फिटनेसवर जास्त मेहनत घ्यावी लागेल. जर इच्छा असेल, तर तो खेळेल. मला वाटते की, तो निश्चितरीत्या आणखी एक विश्वचषक खेळेल. हे त्याच्या डोक्यात आहे.”

रोहितचे विश्वचषकातील प्रदर्शन
विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत रोहितने बॅटमधून आग ओकली. त्याने 11 सामन्यात 125.94च्या स्ट्राईक रेटने 597 धावांचा पाऊस पाडला. यामध्ये 1 शतक आणि 3 अर्धशतकांचाही समावेश होता. 131 ही त्याची स्पर्धेतील सर्वोत्तम धावसंख्या आहे. (former cricketer muttiah muralitharan claims about rohit sharma ahead of world cup 2027 know here)

हेही वाचा-
‘माझ्या काकांसाठी वाईट वाटतंय…’, WC Finalमधील पराभवानंतर द्रविडची पुतणी हळहळली, वाचाच
World Cup Finalच्या एक आठवड्यानंतर शमीची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘फक्त त्या दिवशी 300 धावा…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---