---Advertisement---

‘DRSचा वापर करण्यात राहुलपेक्षा भारी कुणीच नाही’, पाहा कुणी केलाय ‘हा’ दावा

KL-Rahul
---Advertisement---

Sanjay Manjrekar On KL Rahul DRS: भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात उभय संघात अखेरची 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. मात्र, या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघाचे माजी दिग्गज खेळाडू संजय मांजरेकरांचे केएल राहुलविषयी भाष्य चर्चेत आहे. त्यांनी राहुलच्या नेतृत्वाविषयी विधान केले आहे. त्यांनी कौतुक करत म्हटले की, एका खास बाबतीत केएल राहुल एमएस धोनी याच्यासारखा आहे. चला तर, जाणून घेऊयात…

केएल राहुल (KL Rahul) याच्या नेतृत्वात भारतीय संघाने नुकतीच दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका 2-1ने नावावर केली. भारताने दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच मायदेशात पराभूत केले आणि यामुळे राहुलच्या नेतृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संजय मांजरेकरांचे विधान
संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी म्हटले की, डीआरएस (DRS) घेण्याची वेळ येते, तेव्हा केएल राहुल एमएस धोनी (KL Rahul MS Dhoni) याच्यासारखा आहे आणि तो अचूक रिव्ह्यू घेतो. मांजरेकरांच्या नुसार, राहुल नेतृत्वावेळी खूपच कूल दिसला आणि त्याच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव दिसला नाही.

ईएसपीएन क्रिकइंफो या क्रिकेट वेबसाईटशी बोलताना मांजेरकर म्हणाले, “सध्या जेव्हा तुम्ही केएल राहुलला मैदानात पाहता, तेव्हा तो खूपच शांत असल्याचे दिसते. त्याचा माईंडसेट खूपच शानदार अशतो. अपेक्षेनुसार, त्याने संघाचे नेतृत्व केले. नेतृत्वाच्या भूमिकेत तो एकदम फिट बसतो. आयपीएलमध्ये त्याने खूप नेतृत्व केले आहे. दक्षिण आफ्रिकेत एका कसोटी सामन्यातही त्याने नेतृत्व केले होते. तसेच, वनडेतही संघाचे नेतृत्व केले. केएल राहुलकडून तुम्ही आशा करता की, तो कोणतीही मोठी चूक करणार नाही. डीआरएस घेण्यात तो तज्ज्ञ आहे आणि अगदी एमएस धोनी याच्यासारखे निर्णय घेतो.”

खरं तर, भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात 78 धावांनी दणदणीत विजय साकारला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित 50 षटकात 8 विकेट्स गमावत 296 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना यजमान संघाला 45.5 षटकात 218 धावांवरच गाशा गुंडाळावा लागला होता. यानंतर आता भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला मंगळवारपासून (दि. 26 डिसेंबर) सुरुवात होत आहे. (sanjay manjrekar on kl rahul drs gave big statement)

हेही वाचा-
IND vs SA । अर्शदीपच्या कामगिरीचा आई-वडिलांनाही अभिमान! वेगवान गोलंदाजाची पोस्ट चर्चेत
IND vs SA । कसोटीत राहुलला विकेटकिपिंगची संधी! प्रशिक्षक द्रविडकडून खास संदेश

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---