भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने 5 सप्टेंबर रोजी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली होती. यानंतर चाहत्यांपासून ते आजी-माजी क्रिकेटपटूंपर्यंत सर्वांनी या संघाविषयी आपापली मते मांडली. अशात भारताच्या पहिल्या सामन्यापूर्वी माजी खेळाडू संजय बांगर विश्वचषक 2023 प्लेइंग इलेव्हन निवडून चर्चेत आले आहेत. त्यांनी आपल्या संघात दुखापतीनंतर पुनरागमन करणारा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल याला जागा दिली नाहीये. त्यांनी श्रेयस अय्यर आणि ईशान किशन यांना मधल्या फळीत जागा दिली आहे.
विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेतील भारतीय संघाचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या चेपॉक म्हणजेच एमए चिदंबरम स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. भारतीय संघ हा सामना जिंकून स्पर्धेच्या अभियानाची सुरुवात करण्याचा प्रयत्न करेल. दोन्ही बलाढ्य संघांमध्ये जबरदस्त सामना होऊ शकतो.
संजय बांगर (Sanjay Bangar) यांच्या मते, हा सामना चेन्नईमध्ये असल्यामुळे फिरकीपटूंची भूमिका महत्त्वाची ठरेल. बांगर यांनी त्यांच्या प्लेइंग इलेव्हन (Sanjay Bangar Playing 11) संघात दोन फिरकीपटूंची निवड केली आहे. तसेच, चार वेगवान गोलंदाजांची गरज नसल्याचेही ते म्हणाले आहेत.
बांगर म्हणाले, “खेळपट्टीची स्थिती खूपच महत्त्वाची ठरेल. आपल्या सर्वांना माहितीये की, चेन्नईची खेळपट्टी वळण घेते आणि चेंडू थांबत थांबत येतो. त्यामुळे तुम्हाला तिथे 4 वेगवान गोलंदाजांची गरज पडणार नाही. हार्दिक पंड्या तिसऱ्या वेगवान गोलंदाजाची भूमिका साकारू शकतो. त्यामुळे मी माझ्या या संघात अक्षर पटेल याला आठव्या स्थानी ठेवले आहे. मला वाटत नाही की, संपूर्ण विश्वचषकादरम्यान कोणत्याही परिस्थितीत भारतीय संघ आपल्या अव्वल 7 खेळाडूंमध्ये बदल करेल.”
विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी संजय बांगर यांची भारतीय प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज (former cricketer picks team india world cup xi leaves out kl rahul)
हेही वाचाच-
‘नजम सेठी कुठला माल फुकत…’, भारताविरुद्ध गरळ ओकणाऱ्या माजी पीसीबी अध्यक्षावर कडाडला ‘भज्जी’
भारत-पाकिस्तान सामन्याबाबत ब्रेकिंग! आशियाई क्रिकेट परिषदेने घेतला मोठा निर्णय, लगेच वाचा