---Advertisement---

भारत-पाकिस्तान सामन्याबाबत ब्रेकिंग! आशियाई क्रिकेट परिषदेने घेतला मोठा निर्णय, लगेच वाचा

IND-vs-PAK
---Advertisement---

आशिया चषक 2023 स्पर्धेत भारत-पाकिस्तान संघ दुसऱ्यांदा आमने-सामने येणार आहेत. हा सामना 10 सप्टेंबर रोजी श्रीलंकेच्या कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडिअमवर होणार आहे. पहिल्या सामन्याप्रमाणे या सामन्यावरही पावसाचे सावट आहे. मात्र, ही चिंता मिटवण्यासाठी आशियाई क्रिकेट परिषदेने 10 सप्टेंबर रोजी होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी रिझर्व्ह डे म्हणजेच राखीव दिवसही जोडला आहे. त्यामुळे आता पावसामुळे निश्चित तारखेला भारत-पाकिस्तान सामना झाला नाही, तर 11 सप्टेंबर रोजी सामना खेळवला जाईल.

भारत-पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवसाची घोषणा
खरं तर, आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेतील अंतिम सामन्याव्यतिरिक्त हा एकमेव असा सामना आहे, ज्यासाठी राखीव दिवस ठेवला गेला आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, अंतिम सामना आणि सुपर-4 फेरीतील या सामन्यासाठी रिझर्व्ह डे (Reserve Day) यासाठीची तरतूद समान आहे. हे दोन्ही सामने जेव्हा सुरू होतील, त्याच दिवशी संपवण्याचा प्रयत्न केला जाईल. यासाठी सामना छोटा झाला, तरीही त्याच दिवशी संपवला जाईल. असे असूनही सामना पूर्ण झाला नाही, तर दुसऱ्या दिवशी जिथे सामना रोखण्यात आला होता, तिथूनच सुरू केला जाईल.

विशेष म्हणजे, भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघात स्पर्धेचा पहिला सामना पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडिअम येथे खेळवला गेला होता. या सामन्यात सातत्याने पावसाने व्यत्यय आणल्यामुले दुसरा डाव खेळला जाऊ शकला नव्हता. त्यामुळे सामना रद्द करावा लागला. यामुळे फक्त चाहत्यांची निराशाच झाली नाही, तर आशियाई क्रिकेट परिषदेचेही मोठे नुकसान झाले. पीसीबीचे माजी अध्यक्ष नजम सेठी यांनी कोलंबोहून भारत-पाकिस्तान सामने हलवण्याबाबत भाष्य केले होते.

एसीसीने सामने कोलंबोहून हंबनटोटा येथे हलवण्याबाबत विचार केला होता. मात्र, अनेक समस्यांमुळे एसीसी आणि श्रीलंका क्रिकेटने सुपर-4 फेरीतील पाच सामने आणि अंतिम सामना निर्धारित वेळापत्रकानुसार कोलंबो येथेच आजोयित करण्याचा निर्णय घेतला. (asia cup 2023 india vs pakistan match super 4 match reserve day read more)

हेही वाचाच-
बापरे बाप! ऑस्ट्रेलियन क्रिकेटरच्या घरात घुसले 3 अजगर, पठ्ठ्याने अजिबात न घाबरता स्वत: काढलं बाहेर, Video
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी वाढली भारताची ताकद, टीम इंडियात स्टार खेळाडूचे कमबॅक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---