आशिया चषक 2023 स्पर्धेतील बहुप्रतिक्षित भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रविवारी (दि. 10 सप्टेंबर) खेळला जाणार आहे. आशिया चषक 2023 सुपर- 4 फेरीतील हा तिसरा सामना असेल. अशातच भारतीय संघासाठी या सामन्यापूर्वी आनंदाची बातमी समोर येत आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याचे संघात पुनरागमन झाले आहे. बुमराह वैयक्तिक कारणांमुळे श्रीलंकेहून भारतात परतला होता. त्यामुळे त्याला नेपाळविरुद्धच्या सामन्यात खेळता आले नव्हते. मात्र, आता बुमराह संघात परतल्याने पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघाकडून खेळताना दिसू शकतो.
बुमराह का आलेला भारतात?
खरं तर, जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याची पत्नी संजना गणेशन (Sanjana Ganesan) हिने अलीकडेच मुलाला जन्म दिला आहे. यासाठीच बुमराह श्रीलंका सोडून भारतात परतला होता. तो नेपाळविरुद्धच्या सामन्यात खेळू शकला नव्हता. माध्यमांतील वृत्तांनुसार, आता त्याचे संघात पुनरागमन झाले आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघ रविवारी आमने-सामने असणार आहेत. या सामन्यापूर्वी बुमराह सरावही करू शकेल. तो भारतासाठी हुकमी एक्का ठरू शकतो.
Bumrah has joined the Indian team ahead of the Super 4. [Cricbuzz]
– Boom is back….!!!! pic.twitter.com/FzHAyDzHxj
— Johns. (@CricCrazyJohns) September 8, 2023
भारत-पाकिस्तान सामना कुठे होणार?
आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेतील सुपर-4 (Super- 4) फेरीचा तिसरा सामना भारत-पाकिस्तान संघात कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. याठिकाणी पावसामुळे भारतीय संघ इनडोअर सराव करत आहे. क्रिकबझ या क्रिकेट वेबसाईटच्या वृत्तानुसार, बुमराह शुक्रवारी सायंकाळी सराव सुरू करेल. बुमराह इनडोअर नेट्समध्ये भारतीय खेळाडूंसोबत सराव करेल. बुमराहच्या पुनरागमनाने भारतीय गोलंदाज आक्रमणाला आणखी मजबूती मिळाली आहे.
पहिला सामना झालेला रद्द
कोट्यवधी क्रिकेटप्रेमी आशिया चषकातील भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी उत्सुक होते. मात्र, उभय संघातील पहिल्या सामन्यावर पावसाने पाणी फेरले. यानंतर भारताने नेपाळचा सामना केला. हा सामना भारताने 10 विकेट्सने जिंकला. आता भारताला सुपर- 4 फेरीत पाकिस्तानचा सामना करायचा आहे. तसेच, भारत श्रीलंकेविरुद्धही भिडणार आहे. भारत विरुद्ध श्रीलंका संघात 12 सप्टेंबर रोजी सामना खेळला जाणार आहे. यानंतर भारताचा तिसरा सामना 15 सप्टेंबर रोजी बांगलादेशविरुद्ध होणार आहे. याव्यतिरिक्त स्पर्धेचा अंतिम सामना 17 सप्टेंबर रोजी कोलंबोच्याच आर प्रेमदासा येथे खेळला जाणार आहे. (asia cup 2023 indian pacer jasprit bumrah has joined indian team super 4 clash against pakistan)
हेही वाचाच-
वर्ल्डकपसाठी अंपायर्सची यादी आली रे! यादीत 20 पैकी फक्त एकच भारतीय पंच
वर्ल्डकप तोंडावर असताना अख्तरची भविष्यवाणी! पाकिस्तानसह ‘हे’ 2 संघ असतील विश्वचषक विजयाचे प्रबळ दावेदार