सर्वांच्या नजरा लागलेल्या आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी आता एक महिन्याहूनही कमी कालावधी राहिला आहे. 5 ऑक्टोबरपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. अशात स्पर्धेपूर्वी अनेक सहभागी क्रिकेट बोर्ड आपला संघ घोषित करत आहेत. अशातच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने या विश्वचषकासाठी 20 सामना अधिकाऱ्यांची घोषणा केली आहे.
विशेष म्हणजे, आयसीसी बोर्डाने वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेतील साखळी फेरीसाठी 20 सामना अधिकाऱ्यांची निवड केली आहे. तसेच, उपांत्य आणि अंतिम सामन्यासाठी सामना अधिकाऱ्यांची घोषणा त्या-त्या वेळी केली जाईल, असेही सांगितले आहे.
JUST IN: Match officials for #CWC23 announced 👇
— ICC (@ICC) September 8, 2023
या 20 जणांमध्ये 16 पंच असणार आहेत, तर 4 सामनाधिकारी असणार आहेत. यापैकी 12 पंच हे आयसीसीच्या एमिरेट्स एलिट पॅनेलमधील आहेत. ते खालीलप्रमाणे-
क्रिस्टोफर गॅफनी (न्यूझीलंड), कुमार धर्मसेना (श्रीलंका), मरे इरॅस्मस (दक्षिण आफ्रिका), मायकेल गॉफ (इंग्लंड), नितीन मेनन (भारत), पॉल रीफेल (ऑस्ट्रेलिया), रिचर्ड इलिंगवर्थ (इंग्लंड), रिचर्ड केटलबरो (इंग्लंड), रॉडनी टकर (ऑस्ट्रेलिया), जोएल विल्सन (वेस्ट इंडिज), अहसान रझा (पाकिस्तान), आणि एड्रियन होल्डस्टॉक (दक्षिण आफ्रिका).
विशेष म्हणजे, उर्वरित 4 पंच हे आयसीसीच्या इमर्जिंग पंच पॅनेलमधील असतील. त्यात शरफुद्दौला इब्ने शाहिद (बांगलादेश), पॉल विल्सन (ऑस्ट्रेलिया), ऍलेक्स व्हार्फ (इंग्लंड) आणि ख्रिस ब्राऊन (न्यूझीलंड) यांचा समावेश आहे.
दुसरीकडे, सामनाधिकाऱ्यांच्या एमिरेट्स आयसीसी एलिट पॅनेलमध्ये जेफ क्रो (न्यूझीलंड), अँडी पायक्रॉफ्ट (झिम्बाब्वे), रिची रिचर्डसन (वेस्ट इंडिज) आणि जवागल श्रीनाथ (भारत) यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, हे चारही माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहेत.
स्पर्धेविषयी थोडक्यात
आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धा यावर्षी भारतात आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात 5 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर मैदानावर खेळला जाणार आहे. तसेच, स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळला जाईल. विशेष म्हणजे, भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील सामना 14 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. खास बाब अशी की, हा सामनाही नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. (Match officials for the ICC Men’s Cricket World Cup 2023 named see list here)
हेही वाचाच-
वर्ल्डकप तोंडावर असताना अख्तरची भविष्यवाणी! पाकिस्तानसह ‘हे’ 2 संघ असतील विश्वचषक विजयाचे प्रबळ दावेदार
World Cup 2023 पूर्वी बलाढ्य ENG-NZ संघ आमने-सामने, एक वर्षानंतर खेळणार ‘हे’ 2 दिग्गज