जगभरातील आजी-माजी क्रिकेटपटू आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेपूर्वी मोठमोठी भविष्यवाणी करताना दिसत आहेत. काहीजण उपांत्य आणि अंतिम सामना खेळणाऱ्या संघांची नावे सांगत आहेत, तर काहींनी विश्वचषक जिंकू शकणाऱ्या संघांबाबत भविष्यवाणी केली आहे. यामध्ये आता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याच्या नावाचाही समावेश झाला आहे. त्याने हैराण करणारी भविष्यवाणी केली आहे. त्याने विश्वचषक जिंकण्याचा दावेदार संघ कोणता आहे, हे सांगितले आहे. त्याच्यानुसार, मागील 50-60 वर्षांमध्ये हा सर्वात शानदार विश्वचषक होणार आहे. याव्यतिरिक्त तीन संघ आहेत, जे या किताबाचे प्रबळ दावेदार आहेत.
‘पाकिस्तान संघ अंडरडॉग असेल’
शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याचा विश्वास आहे की, या सामन्यात पाकिस्तान संघ अंडरडॉग (सर्वजण कमकुवत समजणारा संघ) असेल. त्याच्या मते, जेव्हा भारत-पाकिस्तान संघ आमने-सामने असतील, तेव्हा विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेविषयी कोणीही चर्चा करणार नाही.
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना अख्तर म्हणाला, “विश्वचषकात भारताविरुद्ध पाकिस्तान संघ अंडरडॉग असेल. जेव्हा हे दोन्ही संघ आमने-सामने असतात, तेव्हा कोणीही विश्वचषकाविषयी बोलत नाही. फक्त भारत विरुद्ध पाकिस्तानची चर्चा होते. माझा विश्वास आहे, की मागील 50-60 वर्षांमध्ये हा सर्वोत्तम विश्वचषक होणार आहे. हा आतापर्यंतचा सर्वोत्तम विश्वचषक होणार आहे. माझी इच्छा आहे, की भारताने याचा भरपूर फायदा उचलावा. मात्र, पाकिस्तान संघ अंडरडॉग असेल आणि ते तीन वेगवान गोलंदाज, एक मध्यमगती वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकीपटूंसोबत खेळणार आहेत. भारत आणि इंग्लंडसह पाकिस्तान संघ विश्वचषक जिंकण्यासाठी मजबूत दावेदार असतील.”
स्पर्धा कधी होणार सुरू?
वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. गतविजेत्या इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड (England vs New Zealand) संघात अहमदाबाद येथे स्पर्धेचा पहिला सामना खेळला जाणार आहे. स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना मुंबईत, दुसरा उपांत्य सामना कोलकाता आणि अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथेच खेळला जाणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील पहिला सामना 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे खेळला जाणार आहे. (india england and pakistan will be favourite for world cup 2023 predicts former pak pacer shoaib akhtar)
हेही वाचाच-
World Cup 2023 पूर्वी बलाढ्य ENG-NZ संघ आमने-सामने, एक वर्षानंतर खेळणार ‘हे’ 2 दिग्गज
धोनीचा अमेरिकत जलवा! Donald Trump यांनी थेट गोल्फ खेळण्यासाठी बोलावले, व्हिडिओ पाहिला का?