भारताचा अनुभवी टेनिसपटू रोहन बोपन्ना याने वर्षातील अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या यूएस ओपनमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याने स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश करत एक विश्वविक्रम आपल्या नावे केला. त्याने सर्वात जास्त वयामध्ये ग्रँडस्लॅमची अंतिम फेरी खेळण्याचा मान मिळवला. रोहन सध्या 43 वर्षांचा आहे.
रोहन याने उपांत्य फेरीचा सामन्यात आपला ऑस्ट्रेलियाचा साथीदार मॅथ्यू एब्डेन याच्यासोबत मिळून फ्रान्सच्या जोडीला 7-6,6-2 असे सरळ सेटमध्ये पराभूत करत अंतिम फेरी गाठली. त्याने 2010 मध्ये याच स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यावेळी मात्र त्याला विजेतेपद पटकावण्यात अपयश आलेले. त्याने आपल्या कारकिर्दीत केवळ एक ग्रँडस्लॅम जिंकले असून, 2017 मध्ये मिश्र दुहेरीत फ्रेंच ओपन त्याने आपल्या नावे केलेले.
गुरुवारी (7 सप्टेंबर) झालेल्या उपांत्य फेरीत सहाव्या मानांकित इंडो-ऑस्ट्रेलियन जोडीला पहिल्या सेटमध्येच निकोलस माहूत व पिएर हरबर्ट जोडीकडून कडवी झुंज मिळाली. दोघेही पहिल्या सेटमध्ये 2-4 ने पिछाडीवर होते पण बोपण्णा-एब्डेनमध्ये जबरदस्त पुनरागमन केले आणि टायब्रेकरमध्ये 7-6 (3) असा सेट जिंकला. पहिल्या सेटच्या या यशाचा परिणाम दुसऱ्या सेटमध्ये दिसून आला, जिथे दोन्ही दिग्गजांनी फ्रेंच जोडीला उभे राहण्याची संधीही दिली नाही आणि 7-6, 6-2 ने अंतिम फेरीत प्रवेश केला.
(Rohan Bopanna Creat History Bopanna And Abden Entered In US Open Men’s Doubles Final)
हेही वाचाच-
बापरे बाप! ऑस्ट्रेलियन क्रिकेटरच्या घरात घुसले 3 अजगर, पठ्ठ्याने अजिबात न घाबरता स्वत: काढलं बाहेर, Video
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी वाढली भारताची ताकद, टीम इंडियात स्टार खेळाडूचे कमबॅक