पाकिस्तान क्रिकेटशी संबंधित व्यक्ती नेहमीच भारतीय संघाविषयी भाष्य करत असतात. अलीकडेच पीसीबीचे माजी अध्यक्ष नजम सेठी यांनी म्हटले होते, भारतीय संघ पाकिस्तानला घाबरत आहे. याबाबत आता भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटले, भारतीय संघ कधीच कुठल्याही संघाला घाबरला नाहीये. तसेच, पाकिस्तानला यापूर्वी अनेकदा पराभूत केले आहे.
खरं तर, आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेतील सुपर-4 फेरीतील सर्व सामने आणि अंतिम सामना कोलंबोच्या आर प्रेमदासा मैदानावर खेळवले जाणार आहेत. मात्र, कोलंबो येथे मागील काही दिवसांपासून सातत्याने जोरदार पाऊस पडत आहे. 10 सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघातील सामन्यादरम्यानही पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशात वृत्त आले होते की, सामने हंबनटोटा येथे हलवले जाणार आहेत. मात्र, नंतर असेही वृत्त आले की, सामने शिफ्ट केले जाणार नाहीत. तसेच, सर्व सामने कोलंबोमध्येच होतील. यावरून पीसीबीचे माजी अध्यक्ष नजम सेठी यांनी बीसीसीआयवर निशाणा साधला होता. ते म्हणाले होते, भारतीय संघाला पराभूत होण्याची भीती आहे. त्यामुळे त्यांना हंबनटोटाला जायचे नाहीये.
‘भारतीय संघ कधीच कुणाला घाबरला नाही’
हरभजन सिंग याने नजम सेठी यांच्या विधानावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना हरभजन म्हणाला, “नजम सेठी सध्या कोणता माल फुकत आहेत, काय माहिती नाही. मला माहिती नाही ते कोणत्या आधारावर हे वक्तव्य करत होते की, पाकिस्तान संघ विजेतेपदाचा दावेदार होता किंवा भारतीय संघाला पाकिस्तानविरुद्ध खेळायचे नाही. कुणीतरी त्यांना रेकॉर्डबद्दल सांगा की, भारताने त्यांना किती वेळा हरवले आहे. हे मूर्खपणाचे भाष्य आहे. ते म्हणाले की, भारतीय संघाला पाकिस्तानसोबत खेळायचे नाही. कारण, भारत घाबरला आहे. भारत कधीच कुणाला घाबरला नाहीये. मला माहिती नाही की, या सर्व गोष्टी कुठून येत आहेत.”
भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील पहिला सामना रद्द
आशिया चषक 2023 स्पर्धेतील भारत-पाकिस्तान संघातील पहिला सामनाही पावसामुळे रद्द झाला होता. या सामन्यावर पावसाने पाणी फेरले होते. त्यानंतर भारताने नेपाळविरुद्धच्या सामन्यात 10 विकेट्सने विजय मिळवला होता. तसेच, आशिया चषकाच्या सुपर-4 फेरीत प्रवेश केला होता. आता 10 सप्टेंबर रोजी भारत-पाकिस्तान सामना होणार आहे. या सामन्याकडे सर्व प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. (cricketer harbhajan singh blasts ex pcb chief for india afraid comment)
हेही वाचाच-
भारत-पाकिस्तान सामन्याबाबत ब्रेकिंग! आशियाई क्रिकेट परिषदेने घेतला मोठा निर्णय, लगेच वाचा
बापरे बाप! ऑस्ट्रेलियन क्रिकेटरच्या घरात घुसले 3 अजगर, पठ्ठ्याने अजिबात न घाबरता स्वत: काढलं बाहेर, Video