भारतीय संघाचे दिग्गज खेळाडू आणि माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी इंग्लंड संघावर चांगलाच संताप व्यक्त केला आहे. रविवारी (दि. 29 ऑक्टोबर) लखनऊच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडिअमवर भारत विरुद्ध इंग्लंड सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंडला 100 धावांनी पराभवाचा धक्का बसला. या पराभवानंतर शास्त्रींनी रोखठोक भाष्य करत इंग्लंडवर आगपाखड केली.
या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 9 विकेट्स गमावत 229 धावा केल्या होत्या. या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंड संघाचा डाव 34.5 षटकात फक्त 129 धावांवर संपुष्टात आला. या सामन्यात समालोचन करत असलेले रवी शास्त्री (Ravi Shastri) म्हणाले की, इंग्लंडला या पराभवाने नक्कीच धक्का बसेल.
काय म्हणाले शास्त्री?
शास्त्री यांनी लक्षात आणून दिले की, इंग्लंड संघ 50 षटकांपर्यंत फलंदाजी करण्यात यशस्वी ठरला नाही. जोस बटलर याच्या नेतृत्वातील इंग्लंड संघाचा हा 6 सामन्यातील पाचवा पराभव आहे. ते म्हणाले, “इंग्लंडसोबतच प्रेक्षक आणि त्यांच्या समर्थकांनाही धक्का बसेल. कारण, ते पराभूत झाले आहेत. न्यूझीलंडने त्यांना हरवले, तेव्हा सामन्यात 17 षटके होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ते 20 षटकात सर्वबाद झाले. तो सामना लवकर संपला. त्यानंतर श्रीलंकेविरुद्ध ते 30 षटकात सर्वबाद झाले. जिथे श्रीलंकेने 25 षटकात आव्हान पार करत सामना संपवला. भारताविरुद्ध संघ 35व्या षटकात सर्वबाद झाला.”
रवी शास्त्रींनी सांगितला फरक
शास्त्रींनी भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) संघातील मोठा फरक सांगितला. त्यांनी सांगितले की, विश्वचषक 2023 (World Cup 2023) पॉईंट्स टेबलमध्ये भारतीय संघ अव्वलस्थानी, तर इंग्लंड अखेरच्या स्थानी आहे. ते म्हणाले, “तुम्ही स्वत:ला विश्वविजेते म्हणवता? याचा अर्थ आहे की, ते आपल्या प्रदर्शनाने दुखी नाहीयेत, तर मग कोण होणार? जर कोणी विचारलं की, भारत आणि इंग्लंडमध्ये फरक काय आहे, तर 8 संघांचा फरक असेल.”
‘चॅम्पियन्स ट्रॉफीचे लक्ष्य ठेवा’
रवी शास्त्री यांनी असेही म्हटले की, इंग्लंडने स्पर्धेतील उर्वरित सामन्यात आपल्या प्रतिष्ठेसाठी खेळले पाहिजे. तसेच, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी क्वालिफाय करण्यावर लक्ष दिले पाहिजे. विश्वचषक 2023 स्पर्धेत पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल 7 संघ आणि यजमान पाकिस्तान संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरेल.
शास्त्री म्हणाले, “इथून पुढे इंग्लंडने आपल्या प्रतिष्ठेसाठी खेळले पाहिजे. मी असे यासाठी म्हणत आहे, कारण ते पॉईंट्स टेबलमध्ये अखेरच्या स्थानी आहेत. 2025मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अव्वल 8 संघ क्वालिफाय होतील. जर इंग्लंड अखेरच्या 2 स्थानी राहिला, तर कल्पना करा की, त्यांच्यासारखा दिग्गज संघ चॅम्पियन्स ट्रॉफीचा भाग नसेल.”
इंग्लंड संघाबद्दल बोलायचं झालं, तर ते 6 सामन्यांपैकी 5 सामने गमावत सध्या पॉईंट्स टेबलमध्ये दहाव्या स्थानी आहेत. त्यांचे फक्त 2 गुण आहेत. तसेच, त्यांचा नेट रनरेट -1.652 इतका आहे. त्यांचे आता तीन सामने उरले आहेत. त्यात त्यांना ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स आणि पाकिस्तानविरुद्ध खेळायचे आहे. (former cricketer ravi shastri slam england cricket team after loss against india at ekana stadium lucknow world cup 2023)
हेही वाचा-
सामना गमावताच श्रीलंकेच्या नावावर विश्वचषकातील सर्वात खराब Recordची नोंद; टीम इंडियाही म्हणेल, ‘नको रे बाबा!’
बुमराह ‘बेबी बॉलर’ असल्याचं वक्तव्य अब्दुल रज्जाकने घेतलं मागे, बोलला ‘ही’ महत्त्वाची गोष्ट