---Advertisement---

‘आग लागल्याशिवाय धूर निघत नाही…’, पंड्याच्या मुंबई इंडियन्समध्ये जाण्याविषयी भारतीय दिग्गजाचे मोठे विधान

On: शनिवार, नोव्हेंबर 25, 2023 4:44 PM
Hardik-Pandya
---Advertisement---

जगातील सर्वात मोठी टी20 आणि प्रतिष्ठित लीग म्हणजे इंडियन प्रीमिअर लीग होय. या लीगचा 17वा हंगाम लवकरच सुरू होणार आहे. मात्र, त्यापूर्वी आयपीएल 2024 लिलाव होणे बाकी आहे. तसेच, लिलावाच्याही आधी आयपीएल संघांमध्ये खेळाडूंची अदलाबदली केली जात आहे. यामध्ये हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स संघाकडे जाणार अशी चर्चाही सुरू आहे. अशात याविषयी भारतीय संघाचा माजी सलामीवीर आकाश चोप्रा याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाला आकाश चोप्रा?
आकाश चोप्रा (Aakash Chopra) याने म्हटले आहे की, हार्दिक पंड्या (Hardik Pandya) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघात जाण्याविषयी बातम्या येत आहे. मात्र, जर पंड्याला मुंबईचा कर्णधार बनवले जाणार असेल, तरच तो जाईल. जर असे झाले नाही, तर त्याचे मुंबईत पुनरागमन करण्याचा अर्थ काय आहे.

हार्दिक पंड्या याच्या संभावित ट्रेडविषयी आकाश चोप्रा याने मोठे विधान केले. त्याने त्याच्या युट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटले की, “एक अफवा सुरू आहे की, हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स संघात जात आहे. असे ऐकायला मिळत आहे, पण अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाहीये. जर तो जात आहे, याचा अर्थ गुजरात टायटन्स त्याला रिलीज करत आहे, ज्यांनी त्याच्या नेतृत्वाखाली एक किताब आणि एकदा अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास केला आहे. जर त्याने मुंबईत पुनरागमन केले, तर त्याला कर्णधार बनवले जाईल का? जर तुम्हाला कर्णधार बनवले गेले, तर तुम्ही का जाणार?”

पुढे बोलताना तो म्हणाला की, “आतापर्यंत हे पूर्णपणे निश्चितही झाले नाहीये आणि त्यामुळे मी वाट पाहत आहे की, नेमकं काय होतंय. आग लागल्याशिवाय धूर निघत नाही. काही ना काही गोष्ट तर नक्कीच आहे, ज्यामुळे हार्दिक पंड्याची एवढी चर्चा सुरू आहे.”

https://twitter.com/CricCrazyJohns/status/1728125355465273590

हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरात पहिल्याच हंगामात चॅम्पियन
हार्दिक पंड्या याने अनेक वर्षे मुंबई इंडियन्स संघासाठी खेळला. यादरम्यान त्याने जबरदस्त प्रदर्शनही केले. मात्र, मागील दोन वर्षांपासून तो गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्व करत आहे. या संघासाठीही त्याने शानदार प्रदर्शन केले आहे. हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरातने पहिल्याच आयपीएल 2022 (IPL 2022) हंगामाचा किताब आपल्या नावावर केला होता. तसेच, आयपीएल 2023 स्पर्धेत त्यांनी अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास केला होता. (former cricketer reacts on hardik pandya s reported move to mumbai indians from gujarat titans)

हेही वाचा-
भारताच्या पराभवानंतर खूप गाजला ‘पनौती’चा वाद, आता शमीनेही दिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘हा राजकीय अजेंडा…’
‘आतापर्यंतचा सर्वात खराब बॉलिंग अटॅक…’, पाँटिंगने उडवली ऑस्ट्रेलियाला जात असलेल्या पाकिस्तान संघाची खिल्ली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---