भारताचा सर्वकालीन महान क्रिकेटपटू व भारतरत्न सचिन तेंडुलकर याची महाराष्ट्र राज्य सरकारने राज्य स्वच्छ मुख अभियानाच्या स्माईल अँबेसिडर पदी नियुक्ती केली आहे. मंगळवारी (30 मे) मुंबई येथे झालेल्या राज्य सरकारच्या कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली.
https://www.instagram.com/p/Cs3T58KNfMw/?igshid=NTc4MTIwNjQ2YQ==
मुंबई येथे झालेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली. यासंबंधीच्या सामंजस्य करारावर सचिनने स्वाक्षरी केली. त्यानंतर गिरीश महाजन यांनी त्याचा सत्कार केला.
या नेमणुकीनंतर बोलताना सचिन म्हणाला,
“राज्य सरकारच्या या उपक्रमात सहभागी होऊन मला आनंद होत आहे. मी कोणत्याही अशा पदार्थाचे सेवन करत नाही ज्याने लोकांमध्ये चुकीचा संदेश जाईल. मी विडी सिगारेट अथवा नशेच्या कोणत्याही गोष्टी कधी घेतल्या नव्हत्या. तंबाखू, सुगंधी सुपारी या गोष्टींची जाहिरातही मी केली नाही. माझ्या वडिलांना मी तसे वचन दिलेले. आज अशाच कार्यक्रमाचा भाग होऊन मला आनंद होतोय.”
यावेळी सचिनने लोकांना तोंडाच्या कॅन्सरपासून सावध राहण्याचे आवाहन देखील केले.
(Former Cricketer Sachin Tendulkar Appointed As Maharashtra State Smile Ambassador)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘लाज वाटते तू भारतरत्न असल्याची’, कुस्तीपटूंच्या आंदोलनप्रकरणी निखिल वागळेंची सचिनवर जहरी टीका
सीएसकेच्या यशामागील खरा चाणक्य! 16 वर्षांपासून सुपर किंग्सला वाट दाखवणारा ‘सुपर कोच’ फ्लेमिंग