मागच्या एक महिन्यापेक्षा जास्त काळापासून दिल्लीत कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंग यांच्याविरोधात कुस्तीपटू आंदोलन करत होते. रविवारी (28 मे) दिल्ली पोलिसांकडून हे आंदोलन उठवण्यात आले. भारताच्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन सुरू असताना दिल्लीतील जंतर-मंतरवर कुस्तीपटूंना पोलिसांनी ताब्यात घेतले. आता तुरुंगातून बाहेर आल्यानंतर या कुस्तीपटूंनी आपली पदके गंगेत सोडून देणार असल्याचे म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणावर भारताचा सर्वकालीन महान क्रिकेटपटू व भारतरत्न सचिन तेंडुलकर याने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी ट्विट करत सचिनवर जहरी टीका केली.
भारतीय कृस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंग यांच्याविरोधात या सर्व आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंच्या तक्रारी आहेत. काही महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंग यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे आरोपही केले आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांच्याविरोधात दोन एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यांना अद्याप अटक झालेली नाही. जोपर्यंत सिंग यांना अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा या सर्व कुस्तीपटूंनी दिला होता. 28 मे रोजी या खेळाडूंचा मोर्चा दिल्ली पोलिसांनी हा मोर्चा दडपला होता.
https://twitter.com/waglenikhil/status/1663482244370149376
क्रीडा क्षेत्रातील अनेक खेळाडूंनी या मुद्द्यावर कुस्तीपटूंना पाठिंबा दिला आहे. मात्र, भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठे नाव असलेल्या सचिनने याविषयी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे वागळे यांनी ट्विट करत म्हटले,
‘प्रिय सचिन, कुस्तीगीर मुलींची वेदना तुला अजूनही समजली नसेल तर तुझ्यातला माणूस मेला आहे! लाज वाटते तू भारतरत्न असल्याची..
#WrestlerProtests
सचिनने यापूर्वी कृषी कायद्यांच्या विरोधातील आंदोलनावेळी सरकारची बाजू घेत, देशाबाहेरील लोकांनी आमच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करू नये असे ट्विट केले होते. त्यावेळी देखील त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आलेली.
(Senior Journalist Nikhil Wagle Take Dig On Sachin Tendulkar After Not Talk About Wrestlers Protest)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्राचे ‘6’ मावळे ज्यांनी गाजवलाय आयपीएलचा सोळावा हंगाम, चौघांनी तर ट्रॉफीच जिंकलीये
नाचू किती…! ढोल वाजू लागताच दीपक चाहरने सुरु केला भांगडा, बेभान होऊन नाचला; बायकोनेही दिली साथ






