जगभरात २१ जून हा ‘म्युजिक डे’ म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे अनेक सेलिब्रेटिंनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत ‘म्युजिक डे’ च्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही स्वत: चा एक जुना व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला.
सचिन तेंडुलकरचा हा व्हिडिओ त्यावेळीचा आहे, जेव्हा तो सोनू निगमबरोबर पहिला गाण्याचा व्हिडिओ शूट करत होता. हा व्हिडिओ २०१७ सालचा आहे. क्रिकेटविषयी तयार करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सोनू निगमसोबत गात आहेत. या गाण्यात फक्त क्रिकेटशी संबंधित शब्द वापरले गेले आहेत.
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करताना सचिनने लिहिले की, “रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये माझ्या पदार्पणाशी संबंधित हा व्हिडिओ मला मिळाल.” याबरोबरच ‘म्युजिक डे’चे हॅशटॅग देताना त्यानी लिहिले, “आज तुम्ही काय ऐकत आहात?”
https://www.instagram.com/p/CQYdFvMgzVk/
सचिन तेंडुलकरला महान फलंदाज म्हणून संबोधले जाते. सचिन तेंडुलकरने पूर्ण विश्व क्रिकेटमध्ये आपला डंका वाजवला आहे. त्याने भारतीय संघासाठी आता पर्यंत अनेकदा आपल्या उत्कृष्ट कामगिरीने भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे. सचिनने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये १०० शतकं ठोकली आहेत आणि त्याचा हा विक्रम अजूनपर्यंत कोणी मोडू शकले नाही.
याशिवाय सचिनने २०० कसोटी सामने खेळले आहे आणि त्यात त्यानी ५३.७९ च्या सरासरीने १५९२१ धावा केल्या आहेत. यामध्ये ६ द्विशतकांचाही समावेश आहे. तर एकूण ५१ शतकं आणि ६८ अर्धशतकांचा समावेश आहे. त्यानी ४६३ एकदिवसीय सामने खेळले आहे . त्यात ४४.८३ च्या सरासरीने १८४२६ धावा केल्या आहेत . त्यामध्ये ४९ शतकं आणि ९६ अर्धशतकांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या
व्हिडिओ: ६,६,६,६… क्वालिफायर सामन्यात फलंदाजाने विरोधकांना फोडला घाम, मारले ४ खणखणीत षटकार
मुल्तान सुलतानची पाकिस्तान सुपर लीगच्या अंतिम फेरीत धडक, इस्लामाबाद युनायटेडला ३१ धावांनी पछाडलं
‘नव्या द वॉल’च्या फलंदाजीला लागलाय सुरूंग, इंग्लंड दौऱ्यातील फ्लॉप कामगिरी करेल पत्ता कट!