India Tour of South Africa: भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर तिन्ही क्रिकेट प्रकारातील मालिका खेळणार आहे. या दौऱ्यात 3 टी20, 3 वनडे आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. यातील वनडे मालिकेसाठी दिग्गज फिरकीपटू युझवेंद्र चहल याची संघात निवड करण्यात आली आहे. मात्र, निवडकर्त्यांच्या या निर्णयावर माजी खेळाडू संजय मांजरेकर हैराण झाले.
खरं तर, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) दौऱ्याची सुरुवात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेने होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना रविवारी (दि. 10 डिसेंबर) डर्बनच्या किंग्समीड क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे. या टी20 मालिकेनंतर भारतीय संघाला 3 सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे.
खरं तर, चहलने 80 टी20 सामन्यात भारताकडून 96 विकेट्स घेतल्या आहेत. मात्र, युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याला टी20 मालिकेसाठी भारतीय संघात सामील केले नाहीये. मात्र, त्याला वनडे संघाचा भाग बनवले आहे. चहलव्यतिरिक्त भारतीय वनडे संघात कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांचाही समावेश आहे.
स्टार स्पोर्ट्सचा शो ‘गेम प्लॅन’मध्ये बोलताना माजी खेळाडू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) म्हणाले की, “मी पुन्हा एकदा खूपच उत्साहित आहे. हे पाहून चांगले वाटले की, दीपक चाहरनेही पुनरागमन केले आहे. कारण, एक क्रिकेटपटू म्हणून मला तो खूपच आवडतो. आवेश खानलाही संधी मिळाली आहे. मला वाटते की, मुकेश कुमार असा खेळाडू आहे, ज्याच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो. मी युझवेंद्र चहलला पाहून थोडा हैराण आहे. मला वाटते की, चहल टी20 क्रिकेटसाठी जास्त चांगला गोलंदाज आहे, पण त्यासाठीही तुमच्याकडे रवी बिश्नोई आहे.”
‘रिंकू सिंगला मोठे प्रमोशन’
रजत पाटीदार, रिंकू सिंग आणि संजू सॅमसन यांची फलंदाजी विभागात निवड झाल्यामुळे मांजरेकर खूपच खुश आहेत. ते म्हणाले की, “खूपच चांगले वाटत आहे की, रजत पाटीदार फिट आहे आणि सामना खेळण्यासाठीही तयार आहे. रिंकू सिंगलाही मोठे प्रमोशन मिळाले आहे. तो आता वनडे क्रिकेटचाही एक भाग बनला आहे. मी संजू सॅमसनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतात वनडे सामना खेळताना पाहिले होते आणि मी त्यालाही खेळताना पाहू इच्छितो. तो खूपच चांगला पर्याय आहे.”
ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका विजय
आयसीसी वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेनंतर भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाला 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 4-1ने पराभवाचा धक्का दिला होता. आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघ कसे प्रदर्शन करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (former cricketer sanjay manjrekar on indias squad for the odi series vs south africa Yuzvendra Chahal)
हेही वाचा-
IPL: ‘इथं खाऊन घे नाहीतर…’, आशिष नेहराने गंभीरला खाऊ घातलेली ‘ती’ गोष्ट, वाचून तुम्हालाही बसेल धक्का
‘IPLने Impact Player Rule रद्द करावा, भारतीय फलंदाज…’, माजी दिग्गजाने का दिला असा सल्ला? घ्या जाणून