भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आयोजित इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वात मोठी टी20 स्पर्धा समजली जाते. भारतातीलच नाही तर विदेशातील प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते की, त्याला एकदा तरी आयपीएल खेळण्याची संधी मिळावी. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरलाही याच संदर्भात एक प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाला त्यांनी अतिशय वेगळ्या पद्धतीने उत्तर दिले.
स्पोर्ट्सकिडा वेबसाइटच्या लाईव्ह सत्रादरम्यान शोएब अख्तरला आयपीएल आणि पीएसएल या दोन्ही स्पर्धेमधून एका स्पर्धेची निवड करण्यास सांगितले गेले होते. तर शोएब अख्तर उत्तर देत म्हणाला की, “मला पीएसएलमध्ये खेळायचे आहे कारण माझे माझ्या देशावर खूप प्रेम आहे आणि मला पैसे कमविण्यासाठी आयपीएलमध्ये खेळायची इच्छा आहे.”
त्यानंतर शोएब अख्तरला या सत्रादरम्यानच आणखी एक प्रश्न विचारला होता. तो प्रश्न असा होता की, शोएब अख्तरला कोणत्या खेळाडू विरुद्ध गोलंदाजी करण्यास सर्वात अवघड वाटते. त्यावर अख्तर उत्तर देत म्हणाला की, त्याला कोणत्याही फलंदाजास गोलंदाजी करणे अवघड जात नसून श्रीलंका संघाकडून 11 व्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या मुथय्या मुरलीधरनला गोलंदाजी करणे सर्वात अवघड वाटते.
याच सत्रादरम्यान शोएब अख्तरला आणखी एक प्रश्न विचारला होते की, आजच्या काळातील कोणत्या फलंदाजाला गोलंदाजी करण्याची इच्छा आहे. त्यावर उत्तर देत शोएब अख्तर म्हणाला की, “मला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम आणि इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला गोलंदाजी करायची आहे.”
पाकिस्तान संघाचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने आयपीएलमध्ये पहिल्या हंगामादरम्यान कोलकाता नाइट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. परंतु, त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्यानंतरच्या हंगामापासून पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना आयपीएलमध्ये खेळण्यास बंदी घातली.
महत्त्वाच्या बातम्या –