भारतीय संघाला डब्ल्यूटीसी अंतिम सामना लाजीरवाण्या पराभवासह गमवावा लागला. पुन्हा एकदा भारतीय फलंदाज महत्त्वाच्या सामन्यात सपशेल फ्लॉप ठरले. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात दिलेल्या 444 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ अवघ्या 234 धावांवर संपुष्टात आला. डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात भारताचा दारुण पराभव होताच भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला की, मोठ्या सामन्यांमध्ये भारतीय फलंदाजांना मोठी खेळी खेळण्याची सवय लावून घ्यावी लागेल.
करावे लागेल सामना जिंकणारे प्रदर्शन
सौरव गांगुली (Sourav Ganguly) याने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना भारतीय फलंदाजांबद्दल प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, “सामना जिंकणारे प्रदर्शन आणावे लागेल. जसे स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आणि ट्रेविस हेड (Travis Head) यांनी केले, जसे एमएस धोनी (MS Dhoni) आणि गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी 2011 विश्वचषक स्पर्धेत केले होते. खेळाडूंना 90-100 धावा कराव्या लागतील, तेव्हाच तुम्ही मोठा सामना जिंकू शकाल. ज्याप्रकारे रिकी पाँटिंगने 2003मध्ये केले होते, 2023मध्ये इथे स्मिथ आणि हेडने केले.”
‘एक किंवा दोन सामने जिंकाल, पण मोठे सामने नाही’
पुढे बोलताना तो म्हणाला की, “आमच्या काळात, आता आणि भविष्यातही, जर तुम्हाला पुढे मोठे सामने जिंकायचे आहेत आणि कसोटीच्या कोणत्याही एका डावात 350-400 धावा केल्या नाहीत, तर तुम्ही विजयाच्या स्थितीत पोहोचू शकत नाहीत. तुम्ही एक किंवा दोन सामने जिंकाल, पण मोठे सामने जिंकू शकणार नाहीत.”
With #TeamIndia being on the receiving end, @SGanguly99 & @harbhajan_singh discuss how Indian batters will have to step up on the biggest occasions! ????????#WTC23 #WTCFinal #Cricket pic.twitter.com/cRnSCyWG5J
— Star Sports (@StarSportsIndia) June 12, 2023
‘मोठा खेळाडू तो असतो, जो मोठ्या मंचावर ट्रॉफी जिंकून देतो’
तसेच, हरभजन सिंग (Harbhajan Singh) यानेही भारतीय संघाच्या पराभवावर नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला की, “मोठा खेळाडू तो असतो, जो मोठ्या मंचावर येऊन देशाला ट्रॉफी जिंकून देतो. जसे स्मिथने केले. तुमचे वैयक्तिक विक्रम बाजूला, पण मोठ्या सामन्यात मोठी कामगिरी करावी लागेल. 2013नंतर 10 वर्षे झाले आहेत. अंतिम सामन्यात येऊन पराभूत होता, धावा करत नाहीत, तर याचे कोणते तरी कारण असेल.”
तो पुढे म्हणाला की, “तुम्ही अडीच दिवसाचा सामना खेळून आणि विजय मिळवून खोटा आत्मविश्वास मिळवता, हे आता चालणार नाही. तुम्हाला कसोटी सामना जिंकण्यासाठी मेहनत करावी लागेल.”
भारतीय संघ जुलै महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर
डब्ल्यूटीसी अंतिम सामना (WTC Final) गमावल्यानंतर आता भारतीय संघ एक महिना कोणतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार नाहीये. मात्र, त्यानंतर भारत वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारताला 2 कसोटी, 2 वनडे आणि 5 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. यादरम्यान अनेक युवा खेळाडू भारतीय संघाच्या जर्सीत खेळताना दिसू शकतात. (former cricketer sourav ganguly furious at indias crushing defeat in wtc final said this)
महत्वाच्या बातम्या-
WTC Final जिंकताच IPLबद्दल मोठी गोष्ट बोलला स्टार्क; म्हणाला, ‘मला पश्चाताप नाही, 100हून अधिक वर्षे…’
बापरे बाप! 8 फोर…4 सिक्सेस, 21 वर्षीय फलंदाजाने दाखवला IPL फायनलचा दम, TNPLमध्ये झंझावाती बॅटिंग