---Advertisement---

मोठी बातमी! ३३ वर्षांपूर्वी महाराष्ट्र सरकारकडून मिळालेली जमीन गावसकरांनी ‘या’ कारणामुळे केली परत

On: गुरूवार, मे 5, 2022 9:16 AM
sunil-gavaskar
---Advertisement---

भारतीय संघाचे दिग्गज माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी आपल्या कारकीर्दीत यशाची शिखरे गाठली होती. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये १०००० धावांचा टप्पा पार करणारे गावसकर हे पहिले क्रिकेटपटू होते. एकापेक्षा एक विक्रम नावावर करणाऱ्या गावसकरांबाबत मोठी बातमी समोर आली आहे. गावसकरांनी मुंबईत क्रिकेट अकादमी सुरू करण्यासाठी ३३ वर्षांपूर्वी दिलेली सरकारी जमीन परत केली आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार, महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Housing Minister Jitendra Awhad) यांनी गेल्या वर्षी वांद्रे उपनगरातील सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांना दिलेल्या भूखंडाचा वापर न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. या भूखंडावर क्रिकेट अकादमी स्थापन होणार होती. मात्र, तीन दशकांनंतरही ते होऊ शकले नाही. राज्य सरकारच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘गावसकर यांनी हा भूखंड महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाला (म्हाडा) परत केला आहे. गावसकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्यांना वांद्रे येथे ३३ वर्षापूर्वी दिलेल्या भूखंडावर क्रिकेट अकादमी उभारता आली नसल्याची माहितीही आव्हाड यांनी दिली.’

यापूर्वी गावसकरांनी सचिन तेंडुलकरसोबत मिळून अकादमी स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला होता. मात्र, यावर अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. म्हाडाने गावसकरांना जमीन परत करण्याची विनंती केली होती.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

खरं तर, ३३ वर्षांपूर्वी ही जमीन सुनील गावसकर क्रिकेट फाऊंडेशन ट्रस्टला दिली होती. ही जमीन त्यांना क्रिकेट अकादमी बनवण्यासाठी देण्यात आली होती. त्यांना ३ महिन्यांमध्ये अकादमीचे काम सुरू करायचे होते. तसेच, हे काम ३ वर्षांमध्ये पूर्ण करायचे होते. मात्र, असे झाले नाही. आता ३३ वर्षांनंतर गावसकरांनी ही जमीन परत करण्याचा निर्णय घेतला आहे.

गावसकरांची कारकीर्द
सुनील गावसकरांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत १२५ कसोटी सामने आणि १०८ वनडे सामने खेळले आहेत. १२५ कसोटीतील २१४ डावांमध्ये त्यांनी ५१.१२च्या सरासरीने १०१२२ धावा केल्या होत्या. यामध्ये ३४ शतके आणि ४५ अर्धशतकांचा समावेश होता. याव्यतिरिक्त वनडेत त्यांनी ३५.१३च्या सरासरीने ३०९२ धावा केल्या होत्या. या धावा करताना त्यांनी १ शतक आणि २७ अर्धशतके मारली होती.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

अफलातून! वेगाने धावा करत असलेल्या पाटीदारचा काळ बनला चौधरी; चित्त्याच्या चपळाईने झेल घेत धाडले तंबूत

एमएस धोनीने बेंगलोरविरुद्धच्या पराभवाचं खापर कुणावर फोडले? म्हणाला, ‘गुणतालिकेऐवजी चुकांवर लक्ष देण्याची गरज’

माझा होशील का? चेन्नई-बेंगलोर सामन्यात मुलीने सर्वांसमोर केले मुलाला प्रपोज, Video तुफान Viral

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---